वाचन संस्कृती जोपासणे गरजेचे – जिल्हाधिकारी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : आज स्पर्धेच्या युगात टिकाव धरण्यासाठी सदैव अविरत वाचन करावे. वाचन केल्यास विचारांची खोली वाढविता येते. वाचनाकरिता वेळ काढण्यासाठी युवती करावे. कारण आयुष्यातील दिशा ठरविण्यासाठी विद्यार्थी-विद्यार्थींनींनी बाल वयापासूनच विविध प्रकारच्या पुस्तकांबरोबर वर्तमान पत्र वाचावे. व स्पर्धा परीक्षेत भाग घेऊन भारताचे सुजाण नागरिक बनावे. म्हणून वाचन संस्कृती जोपासणे गरजेचे आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले. ते रेल्वे मैदान खात रोड भंडारा येथे उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण अंतर्गत ग्रंथोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन करतांना बोलत होते. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातून ग्रंथपूजन व ग्रंथदिंडी महात्मा गांधी चौकात महात्मा गांधींच्या पूणार्कृती पुतळ्याला मार्ल्यापण करुन ती दिंडी खांबतलाव चौक मार्गे रेल्वे मैदान खात रोड भंडारा येथे भंडारा ग्रंथोत्सव २०२३ ग्रंथ प्रदर्शन व विक्री कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

ग्रंथपूजन व ग्रंथदिंडीचे उद्घाटन जिल्हाधिकारी श्री. योगेश कुंभेजकर यांच्या हस्ते ग्रंथपूजन व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्त्रि शिक्षणाचा पाया रचना?्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज, रंगनाथम, विर बिरसा मुंडा, मॉ. सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करून व्दिप प्रज्वलित करून करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ इतिहास अभ्यासक गुरुप्रसाद पाखमोडे, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष धनंजय दलाल, जिल्हा समन्वय समितीचे निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती लिना ढेंगे – फलके, ज्येष्ठ इतिहास अभ्यासक मोहन बरबडे, भंडारा जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी रविंद्र सोनटक्के, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. समीर कुर्तकोटी, महाराष्ट्र राज्य, मुंबई ग्रंथालय संचालक श्री. अशोक मा. गाडेकर, जिल्हा माहिती अधिकारी श्रीमती शैलजा वाघ – दांदळे, भंडारा नगर परिषदचे मुख्याधिकारी विनोद जाधव, नागपूरचे सहाय्यक ग्रंथालय संचालक श्री. रत्नाकर चं. नलावडे, नारायण नागलोथ इत्यादी मान्यवर उपस्थित होते. ग्रंथदिंडीत शालेय विद्यार्थींनी लेझीम पथक व ढोलताशांच्या गजराने भंडारा शहर दुमदुमले होते.

विशेष म्हणजे गांधी चौकात अर्धा तास वाहतूक खोळंबली होती. जिल्ह्यातील विविध सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष, सचिव, पदाधिकारी, ग्रंथपाल आणि शाळेतील विद्यार्थीविद्याथीर्नीं, वाचकवर्ग, नागरिक व मोठ्या संख्येने उपस्थित होते. लालबहादूर शास्त्री विद्यालय, नुतन कन्या विद्यालय तथा महाविद्यालय, महिला समाज विद्यालय, भागिरथी भास्कर विद्यालयासह अनेक शाळेतील विद्यार्थी- विद्यार्थींनी, शिक्षक शिक्षिका सहभागी झाले होते. वाचनांनी माणुस मोठा होत असतो. आणि त्यामुळे अनेक ठिकाणी त्यांचे गुणगौरव केले जात असते. म्हणून जिल्ह्यातील विद्यार्थी- विद्यार्थींनींना वाचन संस्कृतीचे महत्त्व पटवून देण्यासाठी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या ग्रंथोत्सव २०२३ ग्रंथ प्रदर्शन व विक्री कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. समीर कुर्तकोटी यांनी केले. त्यावेळी उपस्थित मान्यवरांनी ग्रामीण भागातील सार्वजनिक वाचनालयाच्या विविध समस्या व त्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करावे असे मत जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष धनंजय दलाल यांनी मांडले. ग्रंथोत्सवाचा लाभ व्हावा असे आवाहनमान्यवरांनी केले आहे.

उपस्थित मान्यवरांनी विविध मार्मिक उदाहरण देऊन ग्रंथोत्सवाचे महत्व समजावून सांगत मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित मान्यवरांनी ग्रंथोत्सव २०२३ ग्रंथ प्रदर्शन व विक्रीत लावलेल्या विविध स्टॉलला भेट देऊन ग्रंथोत्सवा निमित्त शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता गालफाडे व प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री. रत्नाकर नलावडे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार मुकूंदा ठवकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी घनश्याम कानतोडे, महेश साखरवाडे, ईस्तारी मेंढे, राजकुमार हटवार, प्रदीप रंगारी, विकास गोंधूळे, काका भोयर, सुरेश फुलसुंगे, चंद्रशेखर खोब्रागडे, कृष्णा चिंचखेडे, पी. आर. दर्शनवार, विकास निमकर, सलमा क्रिष्णा चिंचखेडे, शारदा बनकर, अंतिमत: तितीरमारे, राघवी वैद्य, प्राची पुडके, शितल चिंचखेडे, प्रविण मोहरिल, स्नेहा पुडके, किरण मेश्राम, उषा वालदे दिलीप मडावी, विवेक चटप, अविरत बोरकर, मुकेश बन्सोड, शिवा फंदे तसेच जिल्ह्यातील सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष, सचिव, पदाधिकारी, ग्रंथपाल आणि विविध शाळेतील विद्यार्थी- विद्यार्थींनी, वाचकवर्ग, नागरिक, शिक्षक -शिक्षिकांनी सहकार्य केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *