आज मोहाडीत २६ वा परमात्मा एक भव्य सेवक संमेलन

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा महानत्यागी बाबा जुमदेवजी २६ वे ग्राम स्वच्छता अभियान सोमवार दि. २९ जानेवारी २०२४ रोज सोमवारला सकाळी दुपारी १२.३० वाजता बहुउद्देशिय परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडी व नगरपंचायत कार्यालय मोहाडी यांचे संयुक्त विद्यमाने बहुउद्देशिय परमपुज्य परमात्मा एक सेवक सांस्कृतीक भवन मोहाडी येथे जिल्हा परिषद सदस्य नरेश ईस्वरकर यांच्या अध्यक्षतेखाली नगराध्यक्ष छाया डेकाटे यांच्या फित कापून करण्यात आले. प्रमुख अतिथी आमदार राजु माणिकराव कारेमारे, सचिन गायधने, दैनिक भंडारा पत्रिकाचे यशवंत थोटे, देवश्री विजय शहारे, पवन चव्हाण, लाला तरारे, पोलीस उपनिरीक्षक कातीकराम दूधकावरा यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी रेखा मनोहर हेडाऊ, सिराज शेख, वंदना कृष्णा पराते, मनिषा गायधने, अश्विनी प्रविण डेकाटे, सुमन गणेश मेहर, सविता विलास साठवणे, यशवंत ढबाले, नरेश सव्वालाखे, राजू माटे, एकनाथ जीभकाटे, विलास चौधरी, शेषराव ठवकर, कृष्णा पराते, सुनिलमेश्राम, रंजिता राजू कारेमोरे, रितेश वासनिक, सदाशिव ढेंगे, कैलाश तितीरमारे, प्रफुल चकोले, उमेश मोहतुरे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

पाहुण्यांचे स्वागत दुर्गा गौरीशंकर मेहर, सत्यवान निपाने, नरेश मानापुरे, विलास पाटील, भुनेश्वर पारधी, ज्ञानेश्वर बावणे, शंकर मारबते, अभिषेक मारबते, राजेश पुडके, गणेश आकरे, राजाराम मारबते, शालू सुरेश चिंधालोरे, भारती परमानंद थोटे, वंदना कनोजे, मेघा कोल्हे, पुडके कुंदा परमानंद गभने, कविता बालाराम साकुरे, भवन बांते, कैलास ढबाले आदींनी केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार मोरेश्वर सार्वे यांनी मानले. आराध्य भगवान बाबा हनुमानजीच्या कृपेने व महानत्यागी बाबा जुमदेवजीच्या आदेशाने ब.उ.प.पू. परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडीच्या वतीने दु:खी गरीब व अज्ञानी मानवास भगवत प्राप्तीचा परिचय करून देऊन सुखमय जीवनजगण्यास प्रेरीत करुन, वाईट व्यसन व अंधश्रद्धेपासून मुक्त करणारे मानव धमार्चे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजीच्या प्रेरणेने सामुहिक हवनकार्य मोहाडी मंडळातर्फे मंगळवार दि.३० जानेवारी २०२४ ला वर्षे २६ वे आयोजीत केले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *