आजपासून सातोना येथे दोन दिवसीय विदर्भस्तरीय लोककला महासंमेलन

भंडारा पत्रिका/वार्ताहर सातोना : लोकशाहिर अन्नाभाऊ साठे सांस्कृतिक नाट्य मंडळ सातोना द्वारा आयोजित विदर्भस्तरीय लोककला महासंमेलन जि.प. पुर्व माध्यमिक शाळेच्या भव्य पटांगणावर शनिवार दि. २० जानेवारी ते रविवार दि. २१ जानेवारी ला आयोजित करण्यात आले आहे. या लोककला महासंमेलनात विदर्भातील नव अंकी नाटक, तमाशा, लावणी, गोंधळ, भारुड, कलापथक, दंडार, भजन, किर्तन, डहाकानकला, पोवाडे, जात्यावरची गाणी, कथावाचन, गायन, गजल, कव्वाली, वादन तसेच विविध सांस्कृतिक कलाक्षेत्रातील पुरुष व महिला कलावंतांचा कार्यक्रम सादर केले जाणार आहे. लोककला महासंमेलनाच्या उदघाटन आ. राजू कारेमोर, यांच्या हस्ते दुपारी १ वाजता करण्यात येईल.

यावेळी अध्यक्षस्थानी आ. नरेंद्र भोंडेकर, संमेलनाध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर तसेच प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. परीणय फुके, पोलीस अधिक्षक लोहित मतानी, चेतन भैरम, आशु गोंडाणे, प्रताप पवार, सरपंच राजेश हटवार, उपसरपंच भाऊराव डायरे, प्रा. अश्ववीर गजभिये, जि.प. सदस्य आनंद मलेवार, पं.स. सभापती रितेश वासनिक, पं.स. सदस्या सौ. भिष्मा सेलोकर, पं.स. सदस्य कानाभाऊ सव्वालाखे, पंस. सदस्य विलास लिचडे, सदाशिव ढेंगे, नेरी सरपंच सौ. मंगला कारेमोरे, बिड सरपंच सौ. अल्का गौर, उपसरपंच विक्की गायधने, भोसाचे सरपंच लिलाधर ढेंगे, पाहुणीचे उपसरपंच रंजित सेलोकर, खुटसावरीचे सरपंच सुरेश बसिने, मांडेसरचे सरपंच गुलाब सव्वालाखे, खमारी गुटी.चे सरपंच ओमकार दमाहे, विवेक नखाते, भाऊराव वंजारी, संजय मोटघरे, गुरुप्रसाद सेलोकर, भंडारा पत्रिकाचे वार्ताहर मनोज रंगारी आदी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित राहतील.

कार्यक्रमाचे संचालन गणेश हटवार, देवदास लिल्हारे करतील तर प्रस्तावना नाट्यसम्राट बानासुर खडसे करतील. कार्यक्रमाचे मनोगत हभप मदूराज कारेमोरे तसेच आभार प्रदर्शन जयंद्र कारेमोरे, वासुदेव कोंडलकर करतील. समारोपीय कार्यक्रमात लोककलावंतांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येईल. रात्रीला ६ऋ३० वाजता खडीगंमत, तमाशा तसेच नऊ अंकी नाटक सादर केली जाणार आहे. दोन दिवसीय विदर्भस्तरीय लोककला महासंमेलनाला परीसरातील कलावंतांनी तसेच ग्रामवासीयांनी बहूसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक आनासुर खडसे, अध्यक्ष जयंद्र कारेमोरे, उपाध्यक्ष चंद्रकिरण ताराम, सहसविच वासुदेव कोंडलकर, कोषाध्यक्ष गणेश हटवार यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *