आरोग्य विभागाचा ‘आशा’ दिवस मोहाडीत साजरा

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग पंचायत समिती मोहाडीच्या वतीने आशा दिवस कार्यक्रम मोहाडी येथील पंचायत समितीच्या सभागृहात गुरुवार दि.१४ मार्च २०२४ ला दुपारी १.३० वाजता आयोजित करण्यात आले. आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सभापती रितेश वासनिक होते. प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष छाया डेकाटे, उपसभापती विठ्ठल मलेवार, पं.स.सदस्य कैलाश झंझाड, गटविकास अधिकारी कवी खोब्रागडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.चिराग सोनकुसरे, वैद्यकीय अधिकारी डॉ.हिमांशू मते जांब, इंद्रजित गावंडे आंधळगाव, पवन पचघरे बेटाळा, डॉ.स्नेहल आकरे वरठी, पल्लवी शेंडे करडी, दैनिक भंडारा पत्रिकाचे यशवंत थोटे व्यासपिठावर होते. प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या छायाचित्राला पुष्पमाला अर्पण करून दीप प्रज्वलित करण्यात आले.स्वागत गीत वैशाली सुनिल समरित बेटाळा, निशा प्रमोद वैद्य बोथली, मनीषा हिरालाल बनसोड मोहगावदेवी, रचना शरद वासनिक वरठी, संजु विश्वनाथ गोसेवाडे कळमना, मालती गजानन हिंगे पांजरा यांनी म्हटले. सन २०२३-२०२४ या आर्थिक वर्षात मोहाडी तालुक्यातील सर्वाधिक मोबदला प्राप्त करणारे बेटाळा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत रेखा रमेश कुंभलकर रोहा प्रथम क्रमांक. रांगोळी स्पर्धेत सुनंदा वीरेंद्र चामट काटी प्रथम, सुकेशनी सुनील गजभिये चोरखमारी द्वितीय, हेमलता सुरेश गाढवे पारडी तृतीय.

प्रश्नमंजुषा स्पर्धेत सुषमा मारोती बोदरे चिचखेडा प्रथम, सुषमा मिताराम शेंडे वासेरा द्वितीय. गीत गायन स्पर्धेत मंदा सुखदास मात्रे जाब प्रथम तर माया विलास खराबे पालोरा द्वितीय. एकल नृत्य स्पर्धेत लक्ष्मी मिताराम ढेंगे देव्हाडा खुर्द प्रथम तर मनिषा हिरालाल बंसोड मोहगावदेवी द्वितीय क्रमांक. समूह नृत्य स्पर्धेत प्राथमिक आरोग्य आंधळगाव येथील संगीता मनोज गभने डोंगरगाव, सुचिता जयेंद्रकुमार गजभिये सीतेपार, सायत्रा संतोष खुटसावरी, मनीषा मधुसूदन मेश्राम नवेगाव, कविता कैलास पुडके धुसाळा, मीना मुकेश हारगुडे मोरगाव यांनी पटकाविल्याबद्दल प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी गीता दिनेश शेंडे जांब, सुनंदा गोवर्धन माटे वडेगाव यांनी आशा दिनानिमित्त मनोगत व्यक्त केले. सन २०२२२०२३ या वर्षांमध्ये ज्या आशांच्या कार्यक्षेत्रात एकही बालमृत्यू, माता मृत्यू झाले नाही आरोग्याची काळजी घेणारे करडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील गंगा विनायक टेंभुरकर, बेबीनंदा मोरेश्वर जगनिक, साधना रमेश गायधने, श्यामकला रमेश तिबुडे नवेगाव, सीमा भीमराव निमजे, ममता गजभिये, शकुतला विजय ढेंगे, सविता खेमराज बुधे, अनिता पिंगळे, वर्षा खोकले, पौर्णिमा बंडू गाढवे, शालिनी प्रदीप गोंडाणे, पुष्पा धरम वहिले, गीता अशोक मेश्राम, बबिता विलास समरीत, यशोदा भोजराज मुंगुसमारे, प्रतिमा तेजराम गोबाडे, रितू राधेश्याम बिसेन, कला भगवान घोनमोडे,माया विलास खराबे, उषा राजेश बावनकर, गौतमा नितेंद्र बागडे, सुरेखा टेकेस्वर लोंदासे, वरठी प्राथमिक आरोग्य केंद्रातील ममता कैलास बनसोड, रचना सारसचंद्र वासनिक, शालू प्रशांत रामटेके, शारदा शिलव फुले, सुजाता द्राविन रामटेके, योगिता संजय गणवीर, प्रेमकला खुशाल धुर्वे, शशिकला जयपाल गायधने, नीलिमा विनोद भोयर, सुलका पुण्यचंद कडव,छाया निळकंठ पडोळे, आशा रामप्रसाद रेहपाडे, वनिता सुनिल भोवते,

मंगला दिलीप चन्ने, कल्पना सत्यवान सव्वालाखे मांडेसर, मंजुषा संतोष दमाहे रामपूर, सिंधू हिवल बांते खमारी, सुकेशनी सुनिल गजभिये यांना तालुका आरोग्य अधिकारी मोहाडी यांच्या सहीनिशी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. नागरी आरोग्य केंद्र अंतर्गत आपला दवाखान्याचे आरोग्य सेविका मयुरी गटारे, आरोग्य सेवक मनीष झंझाड, वैद्यकीय अधिकारी दिपेश पार्लीकर यांनी १५६ आशा व ८ गटप्रवर्तक असे एकूण १६४ जणांचे बीपी शुगर तपासणी करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आरोग्य सहायक पुरुषोत्तम नेवारे, कुष्ठरोग तंत्र संजय चव्हाण, रनभीर कोटांगले, विशाल वासनिक, सीमंतिनी कठाणे, शिशुपाल खंडाते, रक्षा मेश्राम, मनिषा गणेश निमजे गटप्रवर्तक शेषा राजेश सव्वालाखे, शैला योगेश्वर तितीरमारे, लिलावती रविंद्र दलाल, संगिता बाळकृष्ण उरकुंडे, मधु युवराज जमईवार, रसिला सुतिष्ण चोपकर, सरिता गोपीचंद जेठे, ज्योती राजेंद्र बावणे यांनी परिश्रम केले. प्रास्ताविक कुष्ठरोग तंत्र संजय चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन पुरणलाल मेंढे यांनी केले तर तालुका समूह संघटक स्नेहा दहिवले यांनी आभार मानले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *