२७ मार्चपासून बागेश्वर धाम सरकार यांचा माडगी येथे दिव्य दरबार

भंडारा पत्रिका/वार्ताहर गर्रा बघेडा : मोहाडी- तुमसर तहसील मध्ये पहिल्यांदाच २७ मार्च पासून ते २ एप्रिलपर्यंत बागेश्वर धाम सरकार यांचा दिव्य दरबार लावण्यात येणार आहे. दरबार भगवान नृसिंह यांच्या सान्निध्यात वैनगंगा नदीच्या पात्रात माडगी येथे आयोजन करण्यात आले आहे. येथे बागेश्वर धाम सरकार आणि पीठेश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या राम कथा चा आयोजन केला आहे. ७ दिवसीय हनुमंत-राम कथा चा आयोजन करुन आयोजनच्या ठिकाणी भव्य पंडालचा निर्माण कार्य सुरू आहे. २७ मार्च ला सकाळी ८.३० वाजे मोहाडी च्या चौण्डेश्वरी मंदिरातुन भव्य कलश यात्रेला शुरूआत होणार आहे. मोहाडी आणि तुमसर शहरातुन विभिन्न मार्गाने कथा ठिकाणी पोहचणार आहे. २८ आणि २९ मार्चला दुपारी ४ वाजेपासून राम कथा वाचन पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या द्वारा. ३० मार्चला दुपारी १२ वाजेपासून दिव्य-दरबार लावण्यात येणार आहे. दररोज दुपारी ४ वाजे राम कथा शुरू होणार. ३१ मार्च आणि १ एप्रिल ला दुपारी ४ वाजे कथा वाचन आणि २ अप्रैल ला यज्ञ पूर्णाहुती आणि महाप्रसादीचे कार्यक्रम आयोजन केले आहे. त्याचप्रमाणे ३१ मार्च ला रात्री नागपुर निवासी जयकुमार सोबती भजन संध्या होणार आहे.

कथा मंडपातमध्ये ५ लाख लोकांना बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. शौचालय, पानी, भंडारे, पार्किंग, चिकित्सा सेवा, एम्बुलेंस, सुरक्षा व्यवस्था, सीसीटीवी, एलईडी स्क्रीन ची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे. एसटी महामंडळाचे पण कथा ठिकाणी येण्याकरीता अतिरिक्त बस सेवा उपलब्ध परवानगी घेण्याकरिता प्रयत्न सुरू आहे. कार्यक्रमाचे यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आयोजक किरण ढोमने, बागेश्वर धाम सेवा समिती प्रदेशसह संयोजक रंजन ढोमने, भंडारा जिल्हा संयोजक प्रवीण हडप, गोंदिया जिल्हा संयोजक राजेश तोलानी, मनोज अग्रवाल, संजय खंडेलवाल, प्रेमकुमार पटले आणि समस्त आयोजकांकडून मोलाचे परिश्रम घेण्यात येत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *