दसारामजी अतकरी यांचे मरणोत्तर नेत्रदान

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी : ग्राम सोमलवाडा ह. मु. लाखनी येथील रहिवासी सेवानिवृत्त केंद्रप्रमुख, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त दसाराम गोंडुजी अतकरी वय ८० वर्षे यांचे २४ जानेवारी निधन झाले.मृतक दसाराम अतकरी हे मागील अनेक वर्षापासुन स्वत:च्या वाढदिवसा निमित्त दरवर्षी विविध प्रकारचे दानाचे कार्य करीत असत.यातुनच त्यांची दानपार्मीता दिसुन येते. हीच दानपार्मीता त्यांनी त्यांच्या मृत्यूपश्चातसुध्दा कायम ठेवली. मृत्यूपश्चात त्यांनी नेत्रदान करण्याचा संकल्प पुर्वीच केला होता. त्यानुसार दसाराम अतकरी यांच्या निधनानंतर अवयव दान समितीचे डॉ.सुनील मेश्राम यांच्या मार्गदर्शनात भंडारा जिल्हा सामान्य रूग्णालय येथील नेत्रचिकित्सा अधिकारी डॉ.प्राची बंग व चिकित्सा अधिकारी डॉ.नादिरा मेश्राम यांनी दसराम अतकरी यांच्या निधनानंतर अवघ्या सहा तासाच्या आत नेत्रदानाची प्रक्रिया पार पाडली. दसारामजी अतकरी हे पेंशनधारकांच्या हितासाठी नेहमी पुढाकर घेत शासन दरबारी पेंशनधारकांच्या न्याय मागण्यांसाठी लढा देण्याचे काम करीत होते. दसारामजी अतकरी हे तालुक्यातील अनेक गावांमध्ये होतकरू गरिब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप यासह इतरही आवश्यक ती मदत करीत असत. यासह मृत्यूपश्चात अत्यंत गरजेची असलेल्या शित शवपेटी चे सुध्दा त्यांनी दान केले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *