अखेर ‘त्या’ विद्यार्थ्याचा मृतदेह आढळला

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी :- मित्रासोबत नाल्यावरील बंधाºयावर पोहण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यास बंधाºयातील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने बुडाल्याची घटना बुधवार(ता.१४) रोजी दुपारी ३:०० वाजता चे दरम्यान उघडकीस आली होती. पण त्याचा मृतदेह सापडला नव्हता. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन ची चमू व लाखनी पोलिसांच्या अथक परिश्रमाने ४३ तासानंतर शनिवार (ता.१६) सकाळी ११.०० वाजता दरम्यान त्याचा मृतदेह तब्बल दीड किलोमीटर अंतरावर पोहरा ते पेंढरी पुलाजवळ मिळाला. बुडालेल्या विद्यार्थ्याचे नाव आदित्य विजय वाघाये (१७) रा. केसलवाडा/ वाघ, तालुका लाखनी असे आहे. तो स्व. निर्धनराव पाटील वाघाये कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता ११वी चा विद्यार्थी होता. आदित्य हा ४ ते ५ मित्रांसोबत पोहण्यासाठी चान्ना शेत शिवारातील नाल्यावरील बंधाºयावर पोहण्यासाठी गेला होता. नाल्याच्या पाळीवर कपडे व चपला काढून पाण्यात पोहण्यासाठी शिरला असता बंधाºयातील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडाला. ही बाब त्याचे सोबत पोहण्यासाठी गेलेल्या मित्र मंडळींच्या निदर्शनास आल्याने एकाने भ्रमणध्वनी वरून त्याचे कुटुंबास माहिती दिली. कुटुंबीयांनी लाखनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. केसलवाडा/वाघ येथील काही पट्टीच्या पोहणाºया युवकांकडून मृतदेहाचा शोध घेण्यात आला. पण जोरात पाण्याचा प्रवाह सुरू असल्यामुळे शोधकार्यात अडथळा येत असल्याने मृतदेह मिळून आला नाही.

घटनेची माहिती होताच कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष व आमदार नाना पटोले, माजी आमदार सेवक वाघाये, पंचायत समिती सभापती प्रणाली सार्वे, तहसीलदार महेश शितोळे, पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश गोसावी, पोलीस उपनिरीक्षक अमोल तांबे, महिला पोलिस उपनिरीक्षक गौरी उईके, पोहवा सुभाष राठोड, लोकेश ढोक, धनराज भालेराव , प्रमोद बागडे पोलिस शिपाई संदीप वाघ, खोब्रागडे , तलाठी धावळे, सामाजिक कार्यकर्ता विजय सार्वे यांनी घटनास्थळ गाठले व मृतदेहाचा शोध घेतला. पण शोध न लागल्याने भंडारा येथील आपत्ती व्यवस्थापन चमुस सूचना करण्यात आली. गुरुवारी आपत्ती व्यवस्थापन चमू घटनास्थळावर दाखल झाली पण मृतदेहाचा पत्ता नाही. घटनास्थळावर उपस्थित असणाºयात पाण्याचा प्रवाह जोरात वाहत असल्यामुळे मृतदेह इतरत्र वाहून गेल्याची शक्यता वर्तविली होती. शुक्रवारी (ता. १६ ) ला सकाळी शोधकार्य करण्यात आले सकाळी ११ वाजताच्या सुमारास घटनास्थळापासून तब्बल दीड किलोमीटर अंतरावर त्याचा मृतदेह पोहरा -पेंढरी नाल्याच्या पुलाजवळ एका झाडाला अडकलेल्या स्थितीत आढळला. उत्तरीय तपासणी नंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेमुळे केसलवाडा/वाघ गावावर शोककळा पसरली आहे. घटनेची नोंद लाखनी पोलिसांनी केली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक मिलिंद तायडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार प्रमोद बागडे करीत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *