गांजा ओढणाऱ्यांची पोलीस स्टेशनमध्ये शाळा भरली?

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी : आज दिनांक १६ सप्टेंबरला वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या बातमीनुसार लाखनी येथील ठाणेदार मिलिंद तायडे यांनी लाखनी शहरात गांजा येथे कुठून या प्रकरणाची सहन शहानिशा व चौकशी करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये पालक व गांजा शौकिनांना लाखनी पोलीस स्टेशन मध्ये बोलावून त्यांच्या पालकासह एकूण १६ विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. त्यांची कार्यशाळा घेत गाजा ओढणे हे आरोग्यास हानिकारक आहे त्यामुळे पालकांनी आपला मुलगा जाते कुठे कोणता व्यसन करतो काय शिकतो काय करतो त्याच्याकडे लक्ष देऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करावे अशी ठाणेदारांनी सूचना केली पालकांसोबत त्या गांजा ओढणाºयांना मार्गदर्शन व सूचना दिले असले तरी अजून २५ ते ३० युवक विद्यार्थी या शाळेमध्ये भरती होण्याची माहिती असून त्यांना सुद्धा पुढे च्या महाप्रसादमिळणार असल्याची खात्री लायक माहिती आहे. लाखनीत गांजा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत असून वरिष्ठ अधिकाºयांनी या गांजा प्रकरणाचा शोध लावला तर तरुण पिढी व्यसनाधीन व जीवन उध्वस्त होण्यापासून पासून मुक्त होणार आहेत. लाखनीचे ठाणेदार हे गांजा ओढणाºयांना बोलावीत असले तरी या गांजाची खेप येते कुठून हा प्रश्न अनुत्तरीत आहे.

शहरात वाढत्या गांजा संस्कृतीवर पालकांनी आणि समाज समाजसेवकांनी या प्रश्नाचा छडा लावण्याची गरज निर्माण झाली आहे पोलीस हे समाज हितासाठी कर्तव्य बजावत असले तरी शेवटी समाजानेही आपले पालक काय करतात कुठे राहतात हे जाणून घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याची गरज आज निर्माण झाली आहे . केसलवाडा/वाघ येथील तरुण हा गांजा ओढून पोहायलागेल्या असल्याची चर्चा असली तरी तो गांजा ओढला नसल्याचे त्याचे पालक सांगत आहेत. भंडारा गोंदिया जिल्ह्याला लागूनच मध्य प्रदेश व छत्तीसगडच्या सीमा असून परप्रांतातून मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी सोईस्कर रित्या केली जात आहे. यामुळे सुविधा जनक रित्या जिल्ह्यातील तरुण युवक विद्यार्थ्यांना सहजरित्या गांजा उपलब्ध होत असून युवा वर्ग गांजाच्या आहारी जात आहे व व्यसनाधीन होऊन अपराधी प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत आहे नुकतेच नव्याने आलेले जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी तस्करांवर आळा घालण्यासाठी प्रयत्न सूरू केले असले तरी गांजाच्या अवैध व्यवसायावर आळा घालण्यासाठी उपाययोजना संदर्भात कर्मचाºयांची योग्य ती कार्यशाळा घेऊन गांजा मुक्त जिल्हा करावा अशी मागणी नागरिक व पालक वगार्तून केली जात आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *