कुंभली येथील हनुमान मूर्तीची विटंबना प्रकरणी गावकºयांचा “रास्ता रोको” चा इशारा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : जवळील कुंभली येथे शनिवार ( दि.०१.) रात्री ०२:३० च्या सुमारास अज्ञात व्यक्तीने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाजूला असणाºया शौचालय समोर व कचरा कुंडीच्या बाजूला चिचवा झाडाखाली श्री हनुमानजी मूतीर्ची स्थापना करून गावात शांतता भंग करून विटंबना करण्याचा प्रयत्न केला. आता याबाबद संतप्त झालेल्या गावकºयांनी दि. १३ एप्रिल २०२३ ला या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी साकोली येथील पत्रकार परिषदेत केली. तसेच रास्ता रोको आंदोलनाचा इशाराही दिला आहे. सदर संतापजनक घटना ०१ एप्रिल २०२३ च्या मध्यरात्रीची असून अज्ञात आरोपींविरुद्ध साकोली पोलीसांनी गुन्हा दाखल केला.

याबाद दोषींवर काहीच कारवाई होत नसल्याने आता गावकºयांनी संतापजनक भुमिका घेतली व आज दि. १३ ला. साकोली येथे प्रेस संपादक पत्रकार सेवा संघ कार्यालयात पत्रकार परिषदेत भुमीका मांडली. बीट जमादार कुरूडकर यांकडे ०७ एप्रिल २०२३ ला तक्रारदार व निवडक गावकºयांचे घटनेबद्दल माहिती असलेले बयाण नोंदविण्यात आले व काही श्री हनुमान मुर्ती स्थापनेच्या अनुषंगाने देणगी स्वरूपात सरपंच उमेद गोडसे यांनी गोळा केलेल्या ( हनुमान भक्त फॅनक्लब कुंभली महाल ) या नावाने देणगी पावती छापून नोव्हेंबर – डिसेंबर २०२२ गोळा केलेल्या पावती पुरावे व बयाण नोंदविले गेले तरी सुद्धा पोलीस कारवाई दिसून येत नाही, घटनेसंदर्भात प्रशासनाला माहितीची विचारणा केली असता पोलीस यंत्रणा उडवाउडवीची उत्तरे देत आहेत , दि. १२ एप्रिल ला जिल्हा पोलीस अधीक्षकांना सुद्धा गावकºयांतर्फे घटनेबाबद निवेदन देण्यात आले.

या संतप्त प्रकरणी सर्व उडवाउडवी व असमाधानकारक कार्यवाहीमुळे घटनेत सहभागी असलेल्या गुन्हेगारांना शिक्षा होत नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. पोलीस प्रशासनाने दोषींवर व या प्रकरणात सहभागी असलेल्यांवर दि. १८ एप्रिल २०२३ पर्यंत कार्यवाही न झाल्यास दि. २० एप्रिल २०२४ ला संपूर्ण गावकरी व हिंदु समाजाच्या वतीने न्याय मिळविण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. पत्रकार परिषदेत सचिन भेंडारकर, सुभाष गि-हेपुंजे, कपिल भेंडारकर, टोनू उके, भोजराम भेंडारकर, कैलाश शिवणकर, निताराम भेंडारकर, श्री हनुमान समिती अध्यक्ष कुंभली हिरालाल ठाकरे, अरविंद भेंडारकर, प्रमोद भेंडारकर, सुधाकर खोटेले, ग्रामपंचायत सदस्य नितीन भेंडारकर, रवि भेंडारकर, सतिश हत्तीमारे, विजू मेंढे, तंटामुक्त समिती अध्यक्ष कुंभली अमोल रहिमतकर हजर होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *