आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव

मोहाडी : तथागत बौद्ध विहार मोहाडीच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती उत्सव शुक्रवार दि. १४ एप्रिल २०२३ ला आयोजित करण्यात आले आहे. सकाळी ८ वाजता पंचशिल झेंड्याचे ध्वजारोहण न.पं.उपाध्यक्ष सचिन बालचंद गायधने, सकाळी ८.०५ वाजता निळया झेंडयाचे ध्वजारोहण नगरसेवक पवण चव्हाण, सकाळी ८.१० वाजता सामुहिक बौद्ध वंदना, सकाळी ८.३० वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनावर आधारीत मार्गदर्शन व भाषणे. सकाळी १० वाजता अल्पोहार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष पवण चव्हाण तर प्रमुख अतिथी सचिन गायधने, सुनिल गिरेपुंजे, आशिष पातरे, प्रदिप वाडीभस्मे, रमेश लांजेवार, धम्मदिप मेश्राम, यशवंत चव्हाण, नरेश देशभ्रतार, अल्का बोरकर, मनोहर तिरपुडे, गणपत मेश्राम आदी प्रामुख्याने राहतील. दुपारी ४.३० वा. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्रासह व भिमगित सुमधूर आवाजात मिरवणुक काढण्यात येईल. रात्री ९ वा.स्वरूची भोज कार्यक्रम होईल.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *