अवैध रेतीची वाहतुक करणाºया भरधाव टिप्परचे समोरचे दोन्ही चाके निखळले

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : रेतीची ओव्हरलोड अवैध वाहतुक करणाºया भरधाव टिप्परचे समोरचे दोन्ही चाके निखळल्याने थेट रूग्णालयाच्या आवार भिंतीवर आदळल्याने आवारभिंत तुटून जमीनदोस्त झाल्याची घटना १६ मार्च ला रात्री १ वाजताच्या सुमारास तुमसर- भंडारा राज्यमार्गावरील डॉ. गादेवार रुग्णालया समोर घडली. मात्र मोठा अनर्थ टळला. यात टिप्पर चालक निखिल ठवकर (२५) रा. खापा ता तुमसर याच्यावर तुमसर पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, सध्या महाराष्ट्रातील रेती घाट बंद असल्याने रेती मध्यप्रदेशातून रेतीची चोरटी अवैध वाहतुक केली जाते.

यात रेतीची अवैध वाहतुक करणारा टिप्पर दिवस रात्र भरधाव वेगाने शहरातून धावत असतात. घटनेच्या रात्री मध्यप्रदेशातून रेती भरून भंडाराकडे जात असलेल्या टिप्पर एमएच ४० एके २६८ या क्रमांकाच्या टिप्परचे चाके निघून सरळ डॉ. गादेवार यांच्या रुग्णालयाची आवारभिंत तोडुन आत शिरला. यात आवारभिंत जवळील एक वृक्ष उन्मळून पडला. तर आवारभिंत जमीनदोस्त झाली. सुदैवाने सदर घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली असल्याने मोठा अनर्थ टळला, अन्यथा दिवसाढवळ्या घडली असती तर अपघात मोठा झाला असता. सदर घटनेची माहिती तुमसर पोलीसांना होताच घटनास्थळी तुमसर पोलिस दाखल होत घटनस्थाळाचा पंचनामा करुन ट्रक चालकांला ताब्यात घेतले. टिप्पर चालक निखिल ठवकर याच्यावर कलम २७९ अंतर्गत तुमसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास तुमसर पोलिस करीत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *