तुमसर येथे १०० वर्षांपासून विधिवत घटस्थापनेची परंपरा कायम

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी तुमसर : तुमसर शहरातील हनुमान नगर येथील सामाजिक कार्यकर्ते अमित हेमराज मेश्राम यांच्या रुक्मिणी निवास्थानी वार्डातील स्थानिक वयोवृद्ध नागरिकांच्या माहितीनुसार शारदीय नवरात्रोत्सवाच्या घटस्थापनेला १०० वर्षे पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले. ब्रह्मांडातील आदिशक्तिआदिमायेची मनोभावे पूजा करणे, म्हणजेच घटस्थापना असून नवरात्रोत्सव म्हटल्यावर दुगेर्ची महापूजा डोळयासमोर येते. नवरात्रीत नवधान्याची रुजवात केली जाते. नऊ दिवस नऊ शिंपणे करून तयार होणारे रुजवण दस्ºयादिवशी देवदेवतांच्या चरणापर्यंत पोहोचविले जाते.

या सणाला नवरात्रोत्सवात १२ प्रकारची कडधान्ये व अन्नधान्ये या रुजवानासाठी टाकले जात असे. ते धान्य या नऊ दिवसांत वाढावे अशी अपेक्षा असे. त्या घटावरील फुले न काढता नऊ दिवस नऊ माळा गुंफल्या जातात. त्याला माळ सोडणे असेही म्हटले जाते. घटरूपी ब्रह्मांडात मारक चैतन्यासहित अवतीर्ण झालेल्या तेजस्वी अशा आदिशक्तीचे अखंड तेवणाºया दीपाच्या माध्यमातून नऊ दिवस देवीच्या पूजन केल्या जातो. हिंदू धर्मात उपवासाचे महत्त्व असून कुटुंबातील सर्व सदस्य नवरात्रीत नऊ दिवस उपवास करून माँ देवीची आराधना करतात. तसेच या दिवशी कन्यापूजा केली जाते. ज्यामध्ये नऊ मुलींची पूजा केली जाते. ज्या अद्याप तारुण्य अवस्थेला पोहोचल्या नाहीत; अश्या नऊ मुलींना दुर्गा देवीच्या नऊ रूपांचे प्रतिनिधित्व मानले जाते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *