सावरकरांचा अपमान सहन करणार नाही- गिरीपुंजे

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : काँग्रेस नेते राहुल गांधी व इतर काँग्रेस नेते यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरा बद्दल अपमान जनक वक्तव्य केले. राहुल गांधी व काँग्रेसला सावरकर कळलेच त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा इतिहास वाचन करावे त्यानंतरच सार्वजनिक बोलावे. स्वातंत्र्यवीर सावरकर हे माफी वर नसून स्वातंत्र्य वीर सावरकरासारखे दुसरे क्रांतिवीर कुणी झाले नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर सर्वांना कळावे याकरीता स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली. असे वक्तव्य भाजपचे जिल्हाध्यक्ष शिवराम गिरीपुंजे यांनी तुमसर येथे स्वातंत्र्यवीर गौरव यात्रानिमित्त आयोजित सभेत व्यक्त केले.
यावेळी माजी खासदार शिशुपाल पटले, माजी नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, नितीन कारेमोरे यांनीही स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावर प्रकाश टाकला. तुमसर येथे सावरकर गौरव यात्रा संताजी मंगल कार्यालयापासून काढण्यात आली व राजाराम सभागृहात त्याची सांगता होऊन सभा घेण्यात आली.सदर सभेला जिल्हा महामंत्री हेमंत देशमुख, माजी नगराध्यक्ष गीता कोंडेवार, सौ. कल्याणी भुरे, मोहाडी च्या नगराध्यक्ष सौ.छाया डेकाटे, शहर अध्यक्ष पंकज बालपांडे, डॉ. हरेंद्र रहांगडाले, सुनील लांजेवार, कुंदा वैद्य, शोभा लांजेवार, राजकुमार मरठे, आशिष कुकडे, जिल्हा परिषद सदस्य बंडू बनकर, दिलीप सार्वे, पंचायत समिति सदस्य लक्ष्मीकांत सेलोकर, सुभाष बोरकर, पवन पाटील, दिनेश निमकर, अमरीश सानेकर, बाबु ठवकर, गजानन निनावे, रामराव कारेमोरेसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. संचालन काशीराम टेंभरे तर आभार भगवान चांदेवार यांनी मानले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *