दिव्यांगांना ५ टक्के निधीचे वितरण

अर्जुनी मोर : शासनाच्या निर्देशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या उत्पन्नातून ५ टक्के निधी वितरण करणे गरजेचे आहे. त्यामुळे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ग्राम पंचायत बोळदे/करड येथे ८ एप्रिल रोजी ५ टक्के निधी दिव्यांगाना वितरीत करण्यात आली. शासनाच्या निर्देशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्वउत्पन्नातून दिव्यांगांना विविध योजनांमध्ये ५ टक्के निधी वितरीत केले जाते. यातंर्गत बोळदे/करड येथे दिव्यांगाना निधीचे वितरण करण्यात आले. ग्राम पंचायत कार्यालयात आयोजित कार्यक्रमात सरपंच बंसीधर पाटील लंजे, उपसरपंच जितेंद्र तुमडाम, रोजगार सेवक मेर्शाम, प्रमोद लंजे, ग्राम पंचायतचे सर्व सदस्य यांच्या उपस्थितीत ५ टक्के निधीचे धनादेश वाटप करण्यात आले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *