मधमाशांच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू, पाच जखमी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : शेतात काम करणाºया शेतकरी व शेतमजुरांवर मधमाशांनी अचानक हल्ला केला. या घटनेत एका शेतमजूर महिला व शेतमालक सेवानिवृत्त शिक्षकाचा मृत्यू झाला. ५ शेतमजूर जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवार, ३ आॅगस्ट रोजी संध्याकाळी ४ वाजताच्या सुमारास गोरेगाव तालुक्यातील कुºहाडी शेतशिवारात उघडकीस आली. सुमन आनंदराव आमडे व लक्ष्मीचंद पुरनलाल पटले (६५) असे मृतांचे नाव आहेत. अंकित लक्ष्मीचंद पटले (२७), ग्यानीराम उईके (५७), माया आमडे (४२), मंदा आमडे (४२), प्रमिला चौधरी (३०) असे जखमींची नावे आहेत. सर्व कुºहाडीचे रहिवासी आहेत. मधमाशांच्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विशेष म्हणजे याआधीही कुºहाडी येथील शिक्षक श्रावण कुंभारे यांचाही मधमाशांच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *