टिप्परच्या धडकेत बोदा येथील युवकाचा मृत्यू

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तिरोडा : तिरोडा गोंदिया महामार्गावरील पूरब कलेक्शन समोरुन बोदा येथील युवक मोटार सायकलने जात असता मागेहुन आलेल्या टिप्परने धडक दिल्याने मोटरसायकलवर मागे बसलेला युवक जबर जखमी झाल्याने उपचारासाठी नागपूरला नेत असता वाटेतच तचा मृत्यू झाला. दि. २०जून चे रात्री ८ वाजताचे दरम्यान तिरोडा गोंदिया महामार्गावरील पूरब कलेक्शन समोरून बोदा येथील युवक तिरोडा येथून विहिरीवरील मोटार पंपाचे साहित्य घेऊन बोदाकडे मोटार सायकल क्रमांक एम एच ३५ झेड ६७२२ ने डबल सीट जात असता मागेहून आलेले टिप्पर क्रमांक एम एच ४० सीएम ५४२६ ने जबरदस्त धडक दिल्याने मोटरसायकलचे मागेबसलेला युवक अरुण राधेश्याम रहांगडाले (३८ वर्ष) टिप्परमध्ये अडकून जबर जखमी झाल्याने त्यास तिरोडा येथील खाजगी रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारा करता गोंदिया येथे नेले असता तेथील डॉक्टरांनी नागपूरला नेण्याचा सल्ला दिल्यावरून नागपूरकडे उपचारा करता नेत असता रस्त्यातच या युवकाचा मृत्यू झाला.

मृतदेह उत्तरीय तपासणी करता उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे आणण्यात आले आहे. मोटर सायकल चालवणारा युवक किरकोळ जखमी झाला असून फिर्यादी मोहन खुशाल गौतम यांचे तक्रारीवरुन तिरोडा पोलिसांनी टिप्पर चालकाविरुद्ध भादंवी कलम ३०४ अ, २७९, १८४ नुसार गुन्हा नोंद करून पुढील तपास हवालदार नितेश बावणे करीत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *