बांधकाम विभागाचे शासकीय विश्रामगृह मोक्यावर कंत्राट कर्मचारी अभावी, देखभाल दुरुस्ती वा-यावर!

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : विदर्भाच्या पूर्व टोकावर असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभाग भंडारा अंतर्गत मोहाडी येथील विश्रामगृह राज्यमागार्ला लागून मोक्यावर असून देखील कंत्राट कर्मचारी अभावी देखभाल दुरुस्ती होत नसल्याने शासनाने त्वरित दखल घेऊन सदर विश्रामगृहावर त्वरित कंत्राट पद्धतीने कर्मचारी नियुक्त करण्याची मागणी मोहाडी तालुका भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष जगदीश निमजे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री भंडारा जिल्हा देवेंद्र फडणवीस यांना केलेल्या निवेदनात नमूद केले आहे. सविस्तर असे की, शासनाच्या धोरणानुसार शासन सा.बां. विभागा अंतर्गत असलेले विश्राम गृह कंत्राटी पद्धतीने देखभाल दुरुस्तीसाठी देण्यात येते. परंतू सदर विश्राम गृहाची कालावधी संपल्यावर देखील तीन महिन्याचाकालावधी लोटून देखील कंत्राट पद्धतीने अजून पर्यंत देखभाल दुरुस्तीसाठी देण्यात आलेले नाही.

त्यामुळे विश्राम गृहात शासकीय कामाकरिता येणाºाा अधिकाºयांना तसेच राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधिंना तसेच पदाधिकारी यांना गैरसोईचे झालेले आहे. तसेच भंडारा जिल्ह्यातील सा.बां. विभाग भंडारा अंतर्गत असलेल्या साकोली, पवनी, लाखांदूर, भंडारा, लाखनी, तुमसर तालुक्यातील विश्राम गृहाच्या सभोवताल भिंतीचे कंपाऊंडवॉल तयार करण्यात आलेले आलेले आहे. परंतू मोहाडी तालुक्याचे विश्रामगृह याला अपवाद आहे. कारण विश्रामगृहराज्यमार्गाला लागून असून देखील विश्रामगृहाचा चारही दिशेला पूर्व-पश्चिम, उत्तर-दक्षिण ला भिंतीचे आवार नसल्याने कोणतीही जनावरे आंत शिरतात. तसेच याच आवारात सा.बां. उपविभागाचे कार्यालय आहे. परंतू कंपाउंडच्या बांधकामासाठी जवळ-जवळ १ कोटींचा अंदाजित खर्च असल्याने कोणत्याही वरिष्ठ अधिका-याने किंवा स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी गांभीर्याने घेतले नाही.

या मागचे कारण गुलदस्त्यात असल्याने या संपूर्ण प्रकरणाची शासनाने दखल घेऊन देखभाल दुरुस्तीसाठी त्वरित कंत्राट देण्यात यावे. तसेच मोहाडी विश्राम गृहाचा कंपाउंड आवार भिंतीकरिता निधी उपलब्ध करून देण्याची मागणी मोहाडी तालुका भा.ज.प.चे उपाध्यक्ष जगदीश निमजे यांनी संबंधित महोदयांना केल्याने शासन कोणती कार्यवाही करते याकडे मोहाडी तालुक्यातील जनतेचे लक्ष केंद्रित झाले आहे. एवढे मात्र नक्की!

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *