पालांदूर येथील अंतर्गत रस्त्याचे काम ‘थंडबस्त्यात’

भंडारा पत्रिका /प्रतिनिधी पालांदूर (चौ): पालांदूर येथील अंतर्गत मुख्यरस्ता मधोमध खोदून त्यातून नळ योजनेची पाइपलाईन टाकल्याने ह्या रस्त्याची झालेली दुरवस्था पाहून अनेक प्रश्न उपस्थित होतात. हा रस्ता प्रधानमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत लाखनी तालुक्यातील पालांदूर-वाकल असा असून याचे बांधकाम मागील कित्येक दिवसांपासून सुरु असून पालांदुर गावातून अंतर्गत रस्त्याचे काम नळ योजनेची पाईपलाईन टाकून झाल्यावरही अद्याप सुरू झाले नसून कामात दिरंगाई केली जात असल्याने ग्रामस्थ पार वैतागले आहेत. संबंधित कंत्राटदार परमार व प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे अधिकारी यांचे हेतू पुरस्पर दुर्लक्ष होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

दळणवळणाची साधने व आरोग्य सेवा प्रभावित

स्थानिक पालांदूर येथील अंतर्गत मुख्य रस्ता खोदून नळ योजनेची पाईपलाईन टाकल्यामुळे रस्त्याचे विद्रूपीकरण झाले आहे. रस्ताभर गिट्टी विखुरली पडलेली आहे. दिवसेंदिवस या रस्त्याची अवस्था बिकट होत आहे, मात्र त्यात कुठलीही सुधारणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे आवागमन करताना सर्वसामान्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. पालांदूर येथील आरोग्य सेवेला याचा मोठा फटका बसला आहे. गंभीर रुग्णांना आणि गरोदर मातांना उपचारासाठी शहराकडे नेतांना खड्डे चुकवायचे की गाडी थांबवायची असाच प्रश्न वाहनधारकापुढे निर्माण होतो त्यामुळे अनेक वेळा किरकोळ अपघातही घडत असल्याचे चित्र आहे. सामान्यत: कोट्यावधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेले रस्ते अल्पावधीतच मातीमोल होत असल्याने या बांधकामावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असते. दर्जेदार बांधकामांकडे दुर्लक्ष झाल्याने रस्त्यांची अवस्था अशी खिळखीळी होऊ नये म्हणून रस्ता बांधकाम करताना संबंधीत विभागाने म्हणजेच प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या अधिकारी व कर्मचाºयांनी याकडे विशेष लक्ष देण्याची गरज

“पालांदूर येथील अंतर्गत मुख्य रस्त्याचे बांधकाम लवकरात लवकर व्हावे याकरिता संबंधित यंत्रणेशी पाठपुरावा करणे सूरु आहे.

” लता कापसे, सरपंच, ग्रामपंचायत पालांदूर (चौ.)

“पालांदूर येथील अंतर्गत रस्ता हा सिमेंट रस्ता प्रस्तावित असून येथील रस्त्याच्या मधोमध पाणीपुरवठ्याच्या नळ योजनेचे काम नुकतेच झाले असून पाईपलाईन टाकल्यामुळे रस्ता दबण्याची शक्यता लक्षात घेता पावसाळ्यानंतर मटेरियल दबल्यावर व यात ग्रामपंचायतने ग्रॅन्युलर मटेरियल भरल्यानंतर काम सुरू करण्यात येईल.

” शैलेश हरकंडे, कनिष्ठ अभियंता, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना भंडारा

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *