पोवारी कवी देवेंद्र चौधरी यांचा नेपाळ देशात सन्मान

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तिरोडा : तिरोडा येथील मराठी, हिंदी व पोवारी बोली चे सुप्रसिध्द कवी व गजलकार (साहित्यिक) अँड. देवेंद्र चौधरी यांना नेपाळ देशातील आंतर बहुप्रतिष्ठित संस्था शब्द प्रतिभा बहुउद्देशीय फाऊंडेशन, द्वारे सन्मानित करण्यात आले. ११ जून २०२३ रोजी नेपाळ देशातील नेपाळगंज येथे शब्द प्रतिभा बहुउद्देशीय फाऊंडेशन, नेपाल द्वारा विश्व प्रतिभा आंतरराष्ट्रीय सन्मान समारोह २०२३ आयोजित केले होते. या सन्मान सोहळ्यात जगातील ६० ते ७० देशातील साहित्यिक व समाजसेवक यांचा, त्यांच्या साहित्य व सामाजिक क्षेत्रातील कामगीरी बघून त्यांची निवड करण्यात आली होती.

या दोन दिवसीय सन्मान समारोहात तिरोडा येथील मराठी, हिंदी व पोवारी बोली चे सुप्रसिध्द कवी व गजलकार (साहित्यिक) अँड. देवेंद्र घनश्याम चौधरी हे नेपाळ देशातील बहुप्रतिष्ठित संस्था शब्द प्रतिभा बहुउद्देशीय फाऊंडेशन, नेपाल द्वारे आयोजित विश्व प्रतिभा आंतरराष्ट्रीय सन्मान समारोह २०२३ मध्ये सन्मानीत मध्ये सन्मानीत करण्यात आले असून आयोजक संस्थेने कार्यक्रमाच्या दुसºया दिवशी विशेष कविसंमेलन देखील आयोजितकविसंमेलनात हिन्दी च्या गजलासह पोवारी बोलीच्या कविता देखील त्यांनी सादर केल्यात. हे विशेष की, पोवारी बोलीच्या कविता हे पूर्वी हिन्दी व इंग्रजी मध्ये त्यांचा भाषांतरकरून त्यानंतर लगेच सादर करण्यात आल्या. हे विशेष की, नेपाळी व पोवारी बोलीत बराच काही साम्य आहे. हे विशेष की, कवी अँड. देवेंद्र चौधरी यांना आजपर्यंत त्यांच्या साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर अनेकदा सन्मानित करण्यात आले आहे. कवी अँड. देवेंद्र चौधरी हे मागील वर्षी मध्यप्रदेश मधील पांढुरना येथील अखिल भारतीय तिसरे पोवारी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले असून हा सन्मान त्यांच्या साहित्याच्या कारकीर्दीत भर टाकणारा आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *