भर पावसात ग्रामपंचायत संगणक परिचालकांचे एक दिवसीय धरणे आंदोलन

गोंदिया:- महाराष्ट्र सरकारने ग्रामपंचायत स्तरावर संगणक परिचालक यांची नियुक्ती केली होती, परंतु या संगणक परिचलकांनी गेल्या अनेक दिवसापासून शासनाकडे आपले लक्ष वेधण्यासाठी आणि आपले मानधन वाढवण्यासाठी अनेक वेळा आंदोलने केली परंतु त्या आंदोलनाचे दखल शासनाने घेतली नाही. म्हणून आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज पुन्हा भर पावसात ह्या संगणक परिचालक यांनी एक दिवसीय धरणे आंदोलन जिल्हा परिषद गोंदिया समोर केले.

संगणक परिचालकांना ६३९० एवढ्या मानधनावर मोठ्या प्रमाणात संगणकावरील काम करण्यास भाग पाडले जाते आणि एवढ्या तूटपुंज्या मानधनावर काम करून आपला परिवाराचा उदरनिर्वाह करावा लागतो मात्र येवड्या मानधनात आपले व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह होत नाही म्हणून २० हजाररुपये मानधनात वाढ करण्यात यावी आणि सर्व संगणक परिचालक नियुक्ती ही कायम करण्यात यावी, निश्चित तारखेला मानधन देण्यात यावे अशा विविध मागण्यांना घेऊन गोंदिया जिल्ह्यातील संगणक परिचालक यांनी एक दिवसीय धरणे आंदोलन केले. या आंदोलनाची दखल जर शासनाने घेतली नाही तर पुढील येत्या ११ डिसेंबर ला नागपुर येथील अधिवेशन वर मोर्चा काढणार आहेत. तर विशेष म्हणजे आज गोंदियात सकाळपासून पाऊस पडत असताना हा एक दिवसीय आंदोलन भर पावसात या कर्मचाºयांनी केला आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *