हवाई सेवेने परिसराचा चौमुखी विकास – खा.पटेल

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : बिरसी येथील इंग्रजकालीन हवाईपट्टीचे विमान तळात रुपांतर व्हावे हे आपले व परिसरवासीयांचे स्वप्न होते. आपण नागरी उड्डयण मंत्री असताना येथे हवाई अड्डा व राष्ट्रीय दर्जाचे हवाई र्प्रशिक्षण केंद्र सुरू केले. आज इंडिगोच्या माध्यमातून बिरसी-हैदराबाद-तिरुपती हवाई सेवा सुरू झाली आहे. व्यापारिक, शैक्षणिकदृष्ट्या याचा परिसरातील नागरिकांना उपयोगासह परिसराचा चौमुखी विकासात नक्कीच भर होईल, असा विश्वास माजी केंद्रीय मंत्री तथा राज्य सभा सदस्य प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला. ते तालुक्यातील बिरसी विमान तळ येथे शुक्रवार १ डिसेंबर रोजी इंडिगो कंपनीच्या हवाईसेवेच्या शुभारंभाप्रसंगी बोलत होते. गतवर्षी याच विमानतळावरून इंदोर-गोंदिया-हैदराबाद हवाई सेवा सुरू करण्यात आली होती मात्र ही सेवा औटघटकेची ठरली. आज बिरसी विमानतळावर इंडिगो कंपनीच्या प्रवासी विमानाने हैदराबाद येथून ४० प्रवाशांसह आगमन झाले. बिरसी विमानतळावरुन हैद्राबाद-तिरुपतीसाठी इंडिगोच्या विमानाने पहिले उड्डाण १२.५५ वाजता घेतले. विमानात ५५ प्रवाशांनी प्रवास केला.

पटेल पुढे म्हणाले, भविष्यात गोंदिया-मुंबई सरळ विमानसेवा इंडिगोच्यावतीने सुरु करण्यासाठी प्रयत्न करु, मध्यप्रदेश व शेजारील जिल्ह्यातील व्यापारी, अधिकारी व व्यवसायिकांनी या सेवेचा लाभ होईल, घ्यावा असे आवाहन केले. नागझिरा नवेगावबांध व्याघ्र प्रकल्पासह मध्यप्रदेशातील कान्हा व्याघ्रप्रकल्पाकरीता हे विमानतळ प्रवेशद्वार ठरेल. देशविदेशातील पर्यटकांनाही लाभ होणार असल्याचे पटेलांनी सांगीतले. यावेळी खासदार सुनिल मेंढे, आ. विनोद अग्रवाल, जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहागंडाले, माजी आमदार रमेश कुथे, माजी आमदार राजेंद्र जैन, कृषी सभापती रुपेश कुथे, जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे, पोलिस अधिक्षक निखील पिंगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, इंडिगोचे राहूल द्विवेदी, विमान प्राधिकरण समितीचे गजेंद्र फुंडे, दिनेश दादरिवाल यांच्यासह अनेक गणमान्य नागरिक उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *