जिल्ह्यातील पाच तालुक्यात अतिवृष्टी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : जिल्हयात मागील चोवीस तासात पाच तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली असून ६३.३ टक्के पावसाची नोंद झाली आहे. संततधार पावसामुळे नदी, नाले व धरणातील जलसाठ्यात वाढ झाली असून पुजारी टोला धरणाचे ८ दरवाजे व कालीसराड धरणाचे ३ दरवाजे प्रत्येकी ०.३० मीटरने उघडण्यात आले आहेत. तसेच गोंदियाजवळून वाहणाºया पांगोली नदीच्या पुलापर्यंत पाण्याचा प्रवाह असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने गोंदियाआमगाव मार्ग बंद करण्यात आला. तर सडक अर्जुनी तालुक्यातील कोसमतांडी-बोळूंदा मार्गावरील नाल्यावरील निमार्णाधीन पुलासाठी बांधलेला पर्यायी मार्ग वाहून गेला. मागील काही दिवसापासून जिल्हात सुरु असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. १ ते १६ जुलै दरम्यान ५२.१ टक्के पावसाची नोंद झाली. १६ जुलै रोजी गोंदिया, आमगाव, सालेकसा, देवरी व सडक अर्जुनी तालुक्यात अतिवृष्टी झाली. गोंदिया तालुक्यात ६५.१ मिमी., आमगाव ७४.४, तिरोडा १४.३, गोरेगाव ६२.२, सालेकसा ७५.७, देवरी ६८.८, अजुर्नी मोर. ६०.२ व सडक अर्जुनी तालुक्यात ८८.५ मिमी पाऊस झाला. पांगोली नदीच्या पुलापर्यंत पाण्याचा प्रवाह असल्याने जिल्हा प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने गोंदियाआमगाव हा सरळ मार्ग बंद केला असून गोंदिया-आमगाव मार्गे अतिमहत्वाच्या कामासाठी खमारीतुमखेडा व गोरेगाव-ठाणा मार्गाने प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.

सडक अर्जुनी तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला असून तालुक्यातील कोसमतांडी-बोळूंदा मार्गावरील नाल्यावर मागील पाच महिन्यापासून निमार्णानिधीन पुलासाठी बांधलेला पर्यायी मार्ग नाल्यातील पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद पडला असून तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील मोठ्या जल प्रकल्पाच्या जलसाठ्यात वाढ झाली आहे. इटियाडोह प्रकल्पात आजघडीला ५१.९२ टक्के, शिरपूर ३७.०९, कालीसराड ६७.३७ व पुजारीटोला धरणात ७६.७४ टक्के जलसाठा आहे. कालीसराड व पुजारीटोला धरणातील जलसाठा वाढल्याने धरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने कालीसराड धरणाचे ३ दरवाजे ०.३० मीटरने व पुजारीटोला धरणाचे ८ दरवाजे ०.३० मीटरने उघडण्यात आले आहेत. तर जिल्ह्यातील ९ मध्यम प्रकल्पात आजपर्यंत ४०.१२ टक्के, २३ लघु प्रकल्पात ३७.५२ व ३८ जुन्या मामा तलावात ३९.३१ टक्के जलसाठा आहे. दरम्यान, मध्यप्रदेशातील संजय सरोवरातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पुजारीटोला, कालीसराड धरणाच्या जलपातळीत वाढ झाल्याने सुरक्षेच्या दृष्टीने यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नागरिकांनी नदी, नाल्याचे पात्र ओलांडू नये, जिल्ह्यात परिस्थिती सामान्य असून नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *