वैद्यकीय महाविद्यालय संदर्भात निघाले शासकीय परिपत्रक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा: प्रत्येक जिल्हावासीयांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या भंडारा जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे स्वप्न आता पूर्ण होण्याच्या दृष्टीने वेगाने हालचाली सुरू झाले आहे. राज्य मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्यानंतर आता शासनाने १४ जुलै २०२३ रोजी काढलेले परिपत्रक स्वप्नपूर्तीच्या दृष्टीने पुढे टाकलेले पहिले पाऊल असे म्हणता येईल. विशेष म्हणजे वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता देताना पद निर्मितीलाही मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांच्या दृष्टीने सर्वच बाबतीत मागास म्हणून ओळखल्या जाणाºया भंडारा जिल्ह्यात हक्काचे वैद्यकीय महाविद्यालय असावे आणि त्या माध्यमातून उत्तम आरोग्याची सेवा आणि डॉक्टर घडावेत, अशी अपेक्षा प्रत्येकाची होती.

या अनुषंगाने मागणीही सातत्याने केली जात होती. या भागाचा लोकप्रतिनिधी या नात्याने खासदार म्हणून निवडून आल्यापासून भंडारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा विषय खासदार सुनिल मेंढे यांनी सातत्याने केंद्र आणि राज्य शासनाच्या संबंधित विभागाचे मंत्री आणि अधिकाºयांकडे लावून धरला. केंद्रीय आरोग्य मंत्री मणसुख मंडाविया, राज्यमंत्री भारती पवार यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे भंडारा जिल्ह्यासाठीचे महत्व पटवून दिले. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन आणि संबंधित विभागाच्या अधिकाºयांना भेटू आणि पत्र व्यवहाराद्वारे सातत्याने पाठपुरावा केला. संसदेच्या अधिवेशनातही हा विषय त्यांनी आवर्जून उपस्थित केला होता. या सर्व प्रयत्नांचा परिपाठ आणि भंडारा जिल्ह्यातील जनतेच्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर अखेर भंडारा जिल्ह्यासाठी शासकीय वैद्यकीय महा- विद्यालय मंजूर झाले. १०० विद्यार्थी क्षमता असलेल्या या महाविद्यालयाला४३० खातांच्या क्षमतेचे रुग्णालयही संलग्नित आहे. २८ जून २०२३ रोजी या महाविद्यालयाला मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्यानंतर १४ जुलै २०२३ म्हणजे दोन दिवसांपूर्वी या अनुषंगाने शासन परिपत्रक काढण्यात आले आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या निर्मितीच्या स्वप्नपूर्तीच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकले गेले असे म्हणता येईल.

या परिपत्रकात राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मानकानुसार आवश्यक तरतुदी समावेश करण्यात आला आहे. महाविद्यालय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्यारुग्णालयाची गरज पूर्ण करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात ७ वर्षासाठी असलेले जिल्हा सामान्य रुग्णालय वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागास वापरण्यास देण्याची मान्यता या परिपत्रकानुसार देण्यात आली आहे. रुग्णालयासाठी आवश्यक असलेली जागाही निश्चित करण्यात आली असून महसूल विभागाच्या अखत्यारीत असलेली पलाडी येथील २५ एकर टेकड्यांची जागा महसूल विभागाच्या संमतीने जिल्हाधिकाºयांमार्फत वैद्यकीय शिक्षण विभागात निशुल्क हस्तांतरित करण्यास मान्यता दिली गेली आहे. या जागेच्या अनुषंगाने नगर रचना विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून इको सेन्सिटिव्ह झोन समितीची परवानगीही लवकरच मिळणार आहे. या समितीचे अध्यक्ष गोंदियाचे जिल्हाधिकारी आहेत. ही परवानगी मिळण्यात कुठल्या अडचणी येणार नाहीत. शासनाने वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला मान्यता देताना पद मान्यताही दिली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी ४४८ तर रुग्णालयासाठी ९८६ पदांची मान्यता जिल्ह्यासाठी देण्यात आली आहे.

प्रस्तावित महाविद्यालय आणि रुग्णालयाचे बांधकाम हे ४८ हजार ३८४ चौरस मीटर एवढ्या जागेत होणार असून त्यात प्रशासकीय इमारत, चिकित्सा विभाग, रुग्णालय इमारत, अधिकारी आणि कर्मचारी आवास, विद्यार्थ्यांसाठीचे वस्तीगृह याचा समावेश राहणार आहे. जवळपास २१६ कोटी ७५ लाख रुपये या निर्मितीवर खर्च होणार असून या खचार्लाही शासनाने मान्यता दिली आहे. तात्पुरत्या स्वरूपात महाविद्यालयासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय वापरावयाचे असल्याने रुग्णालयात किरकोळ बदल आणि आवश्यक ती यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठी २५ कोटीची तरतूद करण्यात आली आहे. एकंदरीतच या शासन निर्णयामुळे भंडारा जिल्हावासियांच्या स्वप्नपूर्तीच्या दृष्टीने वाटचाल सुरू झाली असे म्हणता येईल. पुढील शैक्षणिक वषार्पासून हे महाविद्यालय सुरू झाल्यास येथील डॉक्टर होण्याची स्वप्ने बाळगणाºया विद्यार्थ्यांना जिल्ह्यात शिक्षण घेण्याची संधी मिळेल. वैद्यकीय महाविद्यालयामुळे आरोग्याच्या उत्तमातील उत्तम सुविधा येथे उभ्या राहतील. केंद्र आणि राज्य शासनातील मंत्री आणि अधिकाºयांनी घेतलेल्या कल्याणकारी भूमिकेमुळे आज बहुप्रतिक्षित असे वैद्यकीय महाविद्यालय जिल्ह्यात होणार आहे. खा.सुनिल मेंढे यांचा सततचा पाठपुरावा आणि तगादा याला सकारात्मक घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी दिल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडवीय, राज्यमंत्री भारती पवार, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मंत्री गिरीश महाजन यांचे आभार व्यक्त केले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.