पक्ष जी जबाबदारी देईल ती मी स्वीकारणार-सुनील फुंडे

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा: गेल्या दोन दिवसापासून भंडारा जिल्ह्यातील वृत्तपत्रांमध्ये सुनील फुंडे यांच्या गळ्यात विधानपरिषद सदस्यांची माळ पडणार ते विधान परिषदेचे आमदार होणार, अशा प्रकारच्या बातम्या प्रकाशित झाल्या. या बातम्यांमुळे अनेकांमध्ये गैरसमज निर्माण झाले. खासदार प्रफुल्ल भाई पटेल व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार हे माझ्यावर जिल्ह्याची किंवा राज्याची जी जबाबदारी देतील ती मला मान्य आहे. ज्या काही बातम्या वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झाल्या त्यामुळे अनेक गैरसमज निर्माण झाले. यापुढे गैरसमज निर्माण होईल, अशा कुठल्याही बातम्या प्रकाशित करणे थांबवावे. वरिष्ठ जी जबाबदारी देतील ती स्वीकारणार असे जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनी सांगितले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *