दुर्गामाता दौडला भंडाºयात उत्स्फूर्त प्रतिसाद

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : ं हिंदुराष्ट्राच्या पवित्र भूमीत पुन्हा एकदा प्रभू श्रीरामरायाच्या व छत्रपती शिवरायांच्या राज्यासारख्या भगव्या ध्वजाचे राज्य लवकरच यावे यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान भंडारा विभाग तर्फे श्री दुर्गा माता दौड काढण्यात येत आहे. यंदाचे हे भंडारा विभागातील दुसरे वर्ष असून नवरात्री उत्सवा दरम्यान दररोज पहाटे निघणा-या या श्री दुर्गा माता दौडमध्ये अनेक तरुण-तरुणी सहभागी होत आहेत. आदिशक्ती माता श्री तुळजाभवानी चरणी देश, धर्माच्या स्वत्व स्वाभिमानासाठी, भारतमातेच्या रक्षणासाठी, पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या, धर्मवीर शंभूराजांच्या आणि अगणित धारातीर्थी पडलेल्या मावळ्यांच्या अंगी असणारे शौर्य, साहस प्रत्येक हिंदूच्या अंगी यावेत असे मागणे तुळजाभवानी मातेच्या चरणी मागण्यासाठी श्री दुर्गा माता दौड नवरात्री दरम्यान घटस्थापना ते विजयादशमी पर्यंत दररोज पहाटे ६.३० वाजता श्री दुर्गा माता दौड काढण्यात येत आहे. ं यात धारकरी बंधू-भगिनी तसेच समाजातील इतर नागरिक उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शवित आहेत. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान भंडारा विभागातर्फे काढण्यात येत असलेल्या या दुगार्माता दौडमध्ये मोठया संख्येने समाजातील प्रत्येक हिंदूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान भंडारा विभाग तर्फे करण्यात येत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *