वैनगंगा नदीत एकाची आत्महत्या

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : कारधा येथील वैनगंगा नदी पुलावरून नदीत उडी घेवुन एका विवाहीत तरूणाने आत्महत्या केल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली.रोहित साखरे, ३२ वर्षे रा.भिलेवाडा त.जि.भंडारा असे मृतकाचे नाव आहे.मृतक रोहित हा पेंटींग चे काम करून आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करीत असे. रोहित मागील काही दिवसापासुन आर्थिक विवंचनेत होता व त्यामुळेच त्याने आत्महत्या केल्याची माहिती आहे.रोहितने या अगोदरसुध्दा विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचीही माहिती पुढे येत आहे.मृतकाच्या पश्चात पत्नी,दोन मुली व एक लहान भाऊ असा आप्त परीवार आहे.रोहितच्या मृत्यूने कुटूंबियांवर दुखाचे डोंगर कोसळले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *