जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भंडारा मार्फत जनजागृती कार्यक्रम

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय मुंबई यांच्या दिनदर्शिकानुसार तसेच मान. श्रीमती अंजू एस. शेंडे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्षा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भंडारा यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भंडारा मार्फत दिनांक २३/०९/२०२२ रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, भंडारा येथे मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी हिंगे तहसीलदार भंडारा यांनी संजय गांधी निराधार योजना, राष्ट्रीय कुटुंबलाभ योजना, अंत्योदय योजना, श्रावणबाळ वृध्दापकाळ योजना तसेच तहसील कार्यालयामार्फत राबविण्यात येणाºया विविध शासकीय योजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

अधिवक्ता श्रीमती निला नशिने यांनी मोठया प्रमाणावर दुष्काळ/पुरस्थिती आणि औद्योगीक आपत्तीचे बळी पडलेल्या पिडीतांची विधी/ कायदेविषयक समस्या व त्यावरील उपाय तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, भंडारा मार्फत देण्यात येणाºया विविध योजनांबाबत सविस्तर सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष बिजु बा. गवारे सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भंडारा यांनी सार्वजनिक सेवेची उपयोगीताबाबत तसेच तहसील कार्यालयामार्फत राबविण्यात येणाºया विविध शासकीय योजनांची माहिती घेवून ईतरांनासुध्दा त्याबद्दल माहिती द्यावी तसेच शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे संचालन श्रीमती रेणुका बेदरकर पॅनल अधिवक्ता व आभार मोहन हुंडरी कनिष्ठ लिपिक जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भंडारा यांनी केले. सदर कार्यक्रमाला मोठया प्रमाणात पक्षकार उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधिक्षक डब्ल्यू. एल. कापगते, वरिष्ठ लिपिक साखरकर, कनिष्ठ लिपिक मोहन हुंडरी, दिनेश सावळे, प्रशांत कुंभारे तसेच शिपाई नितेश गोन्नाडे व मयुरी वासनीक यांनी मोलाचे सहकार्य केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *