जय जवान जय किसान संघटनेचे बेमुदत साखळी आंदोलनाला सुरूवात

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : अनेक वर्षांपासून रखडलेला राष्ट्रीय महामार्गा अंतर्गत भंडारा ते खात घोटीटोक येथील भंडारा शहरातील रेल्वे लाईन ते शितला माता मंदिर बीएसएनएल आॅफिस पर्यंत सिमेंट रस्ता बनविलेला नाही. त्यामुळे तेथे दररोज अपघात होत आहे. रस्त्यावर अनेक खड्डे पडल्यामुळे निप्षाप लोकांचे जिव गेले. तेथे प्रशांत नवघरे रा. भंडारा, केवलराम पंचभाई रा.गंगा नगर खोकरला, कनैह्या भोयर रा. आंधळगाव अश्या लोकांचे तिथे अपघात होऊन मृत्यू झाले. परिवार व लहान लहान मुलं पोरकी झाली व घरातील कर्ता पुरुष गेला. तसेच शाळकरी मुलांचे अपघात होत आहे.

सामान्य माणूस आपले जिव मुठीत घेऊन त्या रस्त्यावरून चालत आहे. म्हणून तत्काळ सिमेंट रस्ता बनवण्यात यावे. मागण्या मान्य होत तिथ पर्यंत आंदोलन सुरू राहील. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते राष्ट्रीय सचिव राजु जैन, माजी राज्यमंत्री नानाभाऊ पंचबुद्धे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय दलाल, राजकपुर राऊत, बाबा पाटेकर, सुगत शेन्डे, सुहास गजभिये, भारती लिमजे, जगदीश कडव, नदंकिशोर नागोसे, मनिष सोनकुसरे, राकेश आग्रे, कमलेश मेन्डे, लक्षन कनोजीया, बन्सोड सर, प्रशांत सरोजकर, अंकीत बत्रा, पायल सतदेवे, मोनु रामटेके, किशोर पंचभाई, निश्चल येनोरकर, ओबीसी क्रांती मोर्चा चे अध्यक्ष संजय मते, सरीता मदनकर, सुधीर नायर, नितीन खंडाईत व परिसरातील नागरिकांनी सहभाग घेऊन समर्थन दिले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.