जिल्ह्यात देवदुर्लभ असेच कार्यकर्ते : बावनकुळे

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा: भंडारा जिल्ह्यातील कार्यकर्ते हे देव दुर्लभ आहेत. जेव्हा महाराष्ट्रात काहीच नव्हते तेव्हा भंडारा जिल्ह्यात भाजपचे आमदार होते. जिल्ह्यातील प्रत्येक कार्यकर्ता पक्षाचा कणा असून भविष्यात हे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी प्रत्येकाचे योगदान मोलाचे राहणार असल्याचे मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडले. भाजपा प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच जिल्ह्याच्या दौºयावर आलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्ह्यात आज विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. भाजपा पदाधिकारी संमेलनात बोलताना त्यांनी भारतीय जनता पार्टी आणि भंडारा जिल्हा यांचे नाते उलगडले. जात पात बाजूला ठेवून कार्य करणारा भाजपचा कार्यकर्ता पक्षात त्याच्या कर्तृत्वाने मोठा होतो. माज्यासारखा सामान्य शेतकºयाचा मुलगा प्रदेशाध्यक्ष पदापर्यंत पोहोचू शकतो हीच बाब भाजपच्या सर्वसमावेशकतेची प्रचिती देणारी आहे. पक्षात कुणाचाही वशिला चालत नाही.

आपल्या कर्तुत्वाने येथे नेता तयार होतो असेही बावनकुळे म्हणाले. सामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष अगदी बूथ संघटनेपासून कार्यकर्त्यांना सर्व काही शिकवितो. कार्यकर्ता पक्षाचा मजबूत कणा आहे. बूथ सक्षम असेल तर खंबीरपणे सामथ्यार्ने उभा राहू शकतो त्यामुळे बूथ मजबूत करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत आणि आगामी काळात होणाºया प्रत्येक निवडणुका जिंकण्याच्याच इर्षेने मैदानात उतरावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले . खासदार सुनील मेंढे यांनी यावेळी बोलताना जिल्ह्यात बूथ सक्षमीकरणाचा कार्यक्रम राबविला गेला असल्याचे सांगताना एक मजबूत संघटन जिल्हा तयार झाले असल्याचे सांगितले. शिवा पंधरवड्याच्या निमित्ताने आयोजित केलेले दिव्यांग आणि जेष्ठांसाठीचे शिबिर लोकोपयोगी ठरले असून या निमित्ताने केंद्र शासनाच्या योजना गरजूंपर्यंत पोहोचल्याचे म्हणाले. प्रास्ताविक जिल्हा अध्यक्ष शिवराम गिरीपूंजे यांनी केले. यावेळी व्यासपीठावर डॉ.उपेंद कोठेकर, डॉ.परिणय फुके, शिवराम गिरीपुंजे, संजय भेंडे, बाळाभाऊ अंजनकर, जिल्हाध्यक्ष नंदुरबार विजय चौधरी, शिशुपाल पटले, राजेश काशीवार, रामचंद्र अवसरे, डॉ. हेमकृष्ण कापगते, हेमंत देशमुख, चैतन्य उमाळकर, प्रशांत खोब्रागडे, प्रदीप पडोळे आदी उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *