पोलीसांकडुन अवैध दारूअड्डे उध्वस्त

भंडारा: जिल्ह्यातील कारधा, तुमसर, सिहोरा व आंधळगाव पोलीसांनी अवैधरित्या सुरू असलेल्या मोहापुष्ठलाच्या हातभट्टी दारू भट्टयावर धाड टाकुन ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. कारधा पोलीसांनी आमगाव दिघोरी येथील चेतना लक्ष्मण तरारे वय ३५ वर्षे यांच्या घरी धाड टाकुन १३०० रूपयाची १० लिटर मोहफुलाची हा. भ. दारु जप्त केली. तुमसर पोलीसांनी देव्हाडा येथील विशाल लल्लुसिंग राठोड वय २७ वर्ष याच्या ताब्यातुन ९०० रुपए विंष्ठमतीची ९ लिटर मोहापुष्ठलाची दारू जप्त केली. सिहोरा पोलीसांनी थेरकर टोली येथे धाड टाकुन रविंद्रउर्पष्ठ रवी मानीक थेरकर याच्या ताब्यातुन ८० हजार रुपए विंष्ठमतीचा ८०० किलो सडवामोहापास जप्त केला. पालांदुर पोलीस ांनी विहीरगाव येथे धाड टाकुन खुदाराम मारोती भैसारे वय ३८ वर्षे याच्या ताब्यातुन २१०० रूपये किंमतीचे संत्री कंपनीचे देशी दारूचे ६० नग टिल्लु जप्त केले. सदर कार्यवाही जिल्हा पोलीस अधिक्षक लोहित मतानी, यांचे मार्गदर्शनात कारधा, तुमसर, सिहोरा व आंधळगाव येथील ठाणेदार व यांचे अधिनस्त पथकातील कर्मचाºयांनी पार पाडली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *