गजानन कॉलनीत जुगार अड्यावर छापा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया: शहरातील गजानन कॉलनीत चाललेल्या जुगार अड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून पाच जणांसह एक पोलिसाला ही जुगार खेळताना रंगेहात पकडण्यता आले असून गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून ७२ हजार ५० रुपयांचा मुद्येमाल जप्त केला. ही कारवाई रविवारी (ता. २५) रात्री नऊच्या सुमारास केली. रामनगर पोलिस ठाण्याच्या हद्यीत येणा-या गजानन कॉलनीत जुगार सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. या माहितीवरून त्यांनी रात्री नऊच्या सुमारास छापा टाकला. यावेळी विजय ब्रिजलाल बावनथडे (वय २४), अमन रमेश बावनथडे (वय २५, दोघेही रा. गजानन कॉलनी, गोंदिया), कैलाश लालचंद यादव (वय ४९, रा. यादव चौक, गोंदिया), विवेक विजय बारसे (वय ५२, रा. टीबीटोली, गोंदिया), दिपेश प्रकाश वडीचार (वय ३४, रा. अंगुरबगीचा, गोंदिया), मुकेश साहेबराव अटरे पोलिस कर्मचारी (वय ४२, रा. गजानन कॉलनी, गोंदिया) हे सहाजण जुगार खेळताना आढळले. या सर्वआरोपींकडून रोख ५४ हजार ९५० रुपये, चार मोबाईल हॅण्डसेट, तासपत्ते, एक चटई असा एकूण ७२ हजार ५० रुपयांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला. फिर्यादी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक महेश विघ्ने यांच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी आरोपीं विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड, पोलिस उपनिरीक्षक महेश विघ्ने, रामनगरचे ठाणेदार केंजळे, सहायक पोलिस निरीक्षक जानकर यांनी केली. पुढील तपास सुरू आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *