नौकरच निघाला दुकानातील ८ टीव्ही चोर

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरातील इलेक्ट्रॉलिक्स दुकानातून ८ टीव्ही संच चोरी झाले होते. या प्रकरणात दुकानात काम करणारा नौकरच चोर निघाला. पोलिसांनी त्याला अटक केली असून १ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केली. शिवप्रसाद पिसोडे रा. हिवरा असे आरोपीचे नाव आहे. अंगूर बगीचा येथील सचिन पांडे यांच्या दुकानातून २० जानेवा- री ते ३० एप्रिल दरम्यान ८ एलसीडी टीव्ही चोरी गेल्याचे उघडकीस आले होते. याप्रकरणी शहर पोलिसांनी अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला. तपासादरम्यान मिळालेल्या तांत्रिक व गोपनीय माहिती शिवप्रसाद पिसोडे याचा या प्रकरणात संशयीत म्हणून समोर आला.

दरम्यान पोलिसांनी सापळा रचून त्याच्या घरी धाड टाकून त्याला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्या घरुन ६ नग रिअलमी कंपनीच्या ४३ इंच एलईडी टीव्ही, एक ४३ इंच टीसीएल कंपनीची टीव्ही व एक ३२ इंच टीसीएल कंपनीची टीव्ही असा एकूण किंमत १ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करुन गुन्ह्यात जप्त करण्यात आला. ही कारवाई स्थानीक गुन्हे शाखा पथकातील मपोउपनि वनिता सायकर, पोउपनि महेश विघ्ने, पोहवा सोमेंद्र तुरकर, रियाज शेख, सुजित हलमारे, इंद्रजित बिसेन, दिक्षित दमाहे, धनंजय शेंडे, चापोशि कुंभलवार यांनी केली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *