वडीलांची हत्या करणारा काही तासात अटकेत

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : तिरोडा तालुक्यातील बोधा येथे मुलाने केलेल्या बेदम मारहाणीत वडीलांचा मृत्यू झाल्याची घटना २५ मार्च रोजी सायंकाळी घडली होती. भैय्यालाल नागदेवी (५५) असे मृतकाचे नाव आहे. याप्रकरणी दवनीवाडा पोलिसांनी काही तासात आरोपीला अटक केली. मृतक भैय्यालाल नागदेवी याला दोन पत्नी असून तो आपल्या पहिल्या पत्नीसह गावातील बौद्ध विहारात राहत होता. तर त्याचा लहान मुलगा लंकेश नागदेवी त्याच्या दुसºया पत्नीसोबत गावातराहात होता. भैय्यालाल व त्याच्या मुलामध्ये नेहमीच कौटूंबिक वादातून भांडण व्हायचे. २४ मार्च रोजी लंकेशने शेतीच्या कामासाठी भैय्यालालकडील ट्रॅक्टर घेऊनगेला.

दरम्यान भैय्यालाल २५ मार्च रोजी ट्रॅक्टर परत घेण्याकरिता गेला असता त्यांचा लंकेशसोबत वाद झाला. यावेळी लंकेशने केलेल्या बेदम मारहाणीत भैय्यालालचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर लंकेशने पळ काढला. याप्रकरणी दवनीवाडा पोलिसांनी भादंवि ३०२, ५०४ अन्वये गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी रावणवाडी पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेला तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी लंकेशला भंडारा जिल्ह्यातील वरठी येथून आज, २६ मार्च रोजी ताब्यात घेतले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *