भंडारा स्थागुशाची जुगार व तुमसर पोलीसांची सट्टापट्टी व्यवसायावर धाड

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली:- स्थागुशाच्या अधिकाºयांनी साकोली येथील जुगार अड््डयावर धाड टाकुन आठ आरोपींना ताब्यात घेत ५१ हजार ७०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.तर तुमसर पोलीसांनी शहरातील अवैध सट्टापट्टी व्यवसायीकावर धाड टाकुन १० हजार २०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. भंडारा स्थागुशाच्या पथकाने साकोली तालुक्यातील अवैध जुगार अड्डयावर धाड टाकुन वंसत केशव साखरे वय ४५ वर्षे रा. ताडगाव ता. अर्जुनी (मोर) जि. गोंदिया , सुशिल श्रीधर न्यायमुर्ती वय २७ वर्षे रा. देवलगाव ता. अर्जनी मोर जि. गोंदिया ,देवीदास शालिकराम मेश्राम वय ४० वर्षे रा. बोंड्रगाव देवी ता. अर्जुनी (मोर) , मनोज प्रल्हाद शेंन्डे वय ३५ वर्षे रा. सानगडी ता. साकोली जि. भंडारा ,शिशुपाल उरकुडा कोडापे वय २५ वर्षे रा. भिवखिडकी ता. अर्जुनी(मोर) जि. गोदिया , क्रांतीला उदाराम मेश्राम वय ३२ वर्षे रा. बुरसी टोला ता. अर्जुनी (मोर) , चंद्रशेखर दत्तु राऊत रा. डोंगरगाव ता. अर्जुनी (मोर) व मनोज प्रल्हाद लांजेवार वय अंदाजे ३५ वर्षे रा. सानगडी ता. साकोली यांना ताब्यात घेत नगदी ११ हजार ५५० रु. जुगाराचे साहित्य तासपत्ते व ताडपत्री व मोटार सायकल कि. ४० हजार रुपये असा एकुण ५१हजार ७०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी विरुध्द पोलीस स्टेशन साकोली येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तुमसर पोलीसांनी अवैध सट्टापट्टी घेणाठया प्रशांत प्रभु गभने वय ३० वर्षे रा. कुभार वार्ड तुमसर यांचेवर धाड टाकुन कागदावर आकडे लिहीलेली सट्टापट्टी ,एक ओपो मोबाईल व नगदी असा एकुण १०हजार २०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी विरुध्द पोलीस स्टेशन तुमसर येथे अप क्रमांक ३९०/२२ कलम १२(अ) म. जु. का. प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांचे मार्गदर्शनात भंडारा स्थागुशा पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण, साकोली ठाणेदार जितेद्र बोरकर, तुमसर पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर तसेच स्थागुशा, साकोली व तुमसर पोलीस स्टेशनचे अधिकारी-कर्मचारी यांनी केली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *