विलंबाने येणाºया कर्मचाºयांना सभापतींनी ‘नारळ’ देवून केला सन्मान; कर्मचाºयांना सुनावले खडे बोल

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : वेळ सकाळी ९. ३० वाजताची, आठवड्याचा पहिला दिवस, सभापतींनी पंचायत समितीमध्ये एन्ट्री, समितीमधील सर्वं विभागांची झडती. उशिरा येणाºया कर्मचाºयांना ‘नारळ’ देत सभापती रितेश वासनिक यांनी गांधीगिरी करत त्यांचा सन्मान केला. पंचायत समितीमध्ये अधिकारी व कर्मचाºयांची सगळी मनमर्जी चालली आहे. कार्यालयीन वेळेत एक दोनच कर्मचारी आॅफीसमध्ये उपस्थीत झालेले दिसतात. ९.४५ या वेळेत अधिकाºयांसह कर्मचारीही पंचायत समितीच्या आॅफीसला उशिरा येतात. उशिरा येण्याचे काम अनेकांचे नित्याचे झाले आहे. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे, पंचायत समितीच्या प्रमुख अधिकारी व विभाग प्रमुखांचे विलंबाने येणे. पंचायत समितीमध्ये अधिकारी व कर्मचाºयांची सगळी मनमर्जी चालली आहे. कार्यालयीन वेळेत एक दोनच कर्मचारी आॅफीसमध्ये उपस्थीत झालेले दिसतात. ९.४५ या वेळेत अधिकाºयांसह कर्मचारीही पंचायत समितीच्या आॅफीसला उशिरा येतात. उशिरा येण्याचे काम अनेकांचे नित्याचे झाले आहे. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे, पंचायत समितीच्या प्रमुख अधिकारी व विभाग प्रमुखांचे विलंबाने येणे. खूप झाले या कर्मचाºयांना ताळ्यावर आणले पाहिजे या हेतूने, सभापती सकाळीच पंचायत समितीला आले. त्यांनी आधी कर्मचाºयांचा उपस्थिती रजिस्टर हातात घेतला.

विविध विभागातील दालनात जावून कर्मचारी किती वेळेत हजर आहेत याची पटटाळणी केली. यावेळी धक्कादायक प्रकार समोर आला. गटविकास अधिकारी यांच्यासह ग्रामपंचायत विस्तार अधिकारी आदी कर्मचारी उशिरा आले होते. रोजगार हमीच्या कक्षात एकही कर्मचारी उपस्थीत झालेला नव्हता. पंचायत विभागातील संगणक आॅपरेटर शशिकांत नावाचा एकच कर्मचारी उपस्थिती झाला होता. बांधकाम विभागातील एका अभियंत्यांची उपस्थिती होती. शिक्षण विभाग वगळता एकूण सर्वच विभागातील २९ व संलग्न कर्मचाºयांपैकी १३ कर्मचारी कार्यालयात विलंबाने आले होते. उशिरा आलेल्या प्रत्येक कर्मचाºयांना ‘नारळ’ देवून त्यांचा सन्मान केला. त्या क्षणाला ‘नारळ’ घेणारे कर्मचारी खजील झाले होते. उशिरा आलेल्या कर्मचाºयांना सभापती रितेश वासनिक यांनी चांगलेच धारेवर धरले होते. तसेच त्यांचा वर्गही घेतला. पुढे असे घडत राहिले तर, वरिष्ठ कार्यालयाला निलंबनाचा प्रस्ताव पाठवला जाणार असल्याचे सांगितले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *