रोजंदारी मजुरांचे नगरपंचायतीत समायोजन करा

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : नगरपंचायती मध्ये मागील ग्रामपंचायत काळापासून काम करणाºया १३ मजुरांचा समायोजन करण्या एवजी अचानक पणे काढून टाकण्यात आल्याने त्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला असून या मजुरांना परत कामावर घेण्यात यावे अन्यथा नगरपंचायत कार्यालयासमोर संपूर्ण परिवारासह आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा मजुरांनी पत्र परिषदेत दिला आहे. ग्रामपंचायत काळापासून अंदाजे १५ ते १६ वर्षांपासून १५ मजूर सफाईचे काम करीत आहेत. नगरपंचायत स्थापन झाल्या नंतर सुद्धा आजपर्यंत ते कार्यालयामार्फतच काम करीत होते. परंतु अचानक एक सप्टेंबर पासून त्यापैकी १३ मजुरांना कामावरून कमी करण्यात येत असल्याचे पत्र काढण्यात आले. १५ मजुरांपैकी १३ मजुरांनाच कामावरून काढण्यात आले. हा आमच्यावर अन्याय आहे असे या मजुरांचे म्हणणे आहे. या तेराही मजु- रांना घनकचरा कंत्राटदारांकडे रोजंदारीवर वर्ग करण्यात आले आहे. त्यामुळे या कर्मचाºयांनी कंत्राटदाराकडून आपला वेतन घेतलेला नसल्याने त्यांची दिवाळी अंधारात गेली आहे. आम्हाला नगरपंचायत तर्फेच वेतनदेण्यात यावा, समावेशनासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात यावा, थकीत वेतन पूर्वीप्रमाणे बँकेत जमा करण्यात यावा, समावेशन होईपर्यंत किमान वेतन लागू करण्यात यावा अन्यथा आम्ही संपूर्ण कुटुंबासह नगरपंचायत कार्यालया समोर आमरण उपोषणावर बसू असा इशारा येथे आयोजित पत्र परिषदेत या मजुरांनी दिला आहे. यावेळी वामन हेडाऊ, कवळू डोंगरे, दिलीप निमजे, सुनील सोनवाणे, केशवराव निमजे, सुनील कलोसे, ललित उज्जेनवार, विठ्ठल कुंभारे, चंदन वासनिक, सीमा उजैनवार, पुनाबाई कलोसे, मनोहर हेडाऊ, कलीराम मोगरे उपस्तीत होते. त्यामुळे प्रशासन आता कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *