राज्यस्तरीय समिती करणार सीतेपार गावाचे मूल्यांकन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी मोहाडी : संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा २०१९-२० मध्ये राज्यस्तरावरील स्पर्धेकरीता ग्रामपंचायत सितेपार / झंझाड पात्र ठरली आहे. राज्यस्तरीय स्पर्धेत पात्र असणाºया सितेपार / झंझ- ाड ग्रामपंचायत तपासणी दिनांक ६ नोव्हेंबर रोजी राज्यस्तरीय चमूद्वारे करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत सितेपारने विभागातून दुसरा क्रमांक प्राप्त केला. त्यामुळे राज्यस्तरीय स्पर्धेच्या तपासणी सितेपार पात्र झाली आहे. सीतेपार गावाची लोकसंख्या ६७५ तर कुटुंब १४७ आहे. मोहाडी तालुक्यातील या लहान गावांत क्रांती घडली आहे. गावात शंभर टक्के नळ जोडणी करण्यात आली. नळाला मिटर लावण्यात आले आहेत. गावातील पूर्ण सांडपाणी बंदिस्त नालीने वाहत असते. घर तिथे शोष खड्डे आहेत. या गावात दरवर्षी कर वसुली १०० टक्के होत असते. खताकरीता नाडेफ टाके व गांडूळ खत प्रकल्प तयार करून निर्मिती करण्यात येत आहे. गावातील शासकीय इमारतीवरील पावसाचे पाणी पुर वठा संकलन करून जमिनीत निचरा करण्यात येत असते. रस्त्याच दोन्ही बाजूला वृक्ष लागवड करण्यात आली आहे. पाणी टाकी परिसर व बौद्ध विहार परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात आले आहे.

ग्रामसेवक गोपाल बुरडे यांनी गावात शासकीय योजनांचे फलक गावात जागोजागी लावले आहेत. त्यामळे जाता -येता लोकांना योजनेची माहिती मिळत असते. लोकवर्गणीतून अशा प्रवेशद्वार तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच स्मारक तयार करण्यात आले आहे. गावात दररोज ध्यान व प्रार्थना करण्यात येत असते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुलांना आरओचे शुद्ध पाणी पुरवठा करण्यात आला आहे. तसेच नागरिकांसाठी वॉटर कुलर गावात लावून थंड पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. यापूर्वी गावाला स्मार्ट ग्राम पुरस्कार आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. जिल्हास्तरीय स्वच्छ ग्राम पुरस्कार, विभागीय स्वच्छ ग्राम पुरस्कार प्राप्त झाले. राज्यस्तरीय पुरस्कार मिळावा यासाठी गावकरी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक गोपाल बुरडे, सरपंच मंजुषा झंजाड, उपसरपंच महादेव झंझाड गावाची जोरदार तयारी करीत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *