विकास फाउंडेशनच्या पदाधिकाºयांची भाजपमध्ये घर वापसी!

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : विकास फाउंडेशन चे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते भाजप मध्ये घर वापसी करीत आहेत. मधल्या काळात भाजपचे अनेक कार्यकर्ते काही कारणामुळे भाजपा पासून दूर होऊन विकास फाउंडेशन चे पदाधिकारी म्हणून कार्यरत होते. परंतु मूळ विचारधारा भाजपची असल्याने अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आपले राजकीय कॅरियर भाजप मध्येच असल्याचे लक्षात आल्याने मागील दोन महिन्यांपासून अनेक जि.प.सदस्य, प.स.सदस्य, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विकास फाउंडेशन ला राम राम करत भाजपात प्रवेश घेतला आहे. पुन्हा तुमसर पं.स.चे माजी सदस्य व बाजार समितीचे माजी उपसभापती डॉ.अशोक पटले तसेच प.स.चे माजी सदस्य लक्ष्मीकांत (बंटी) बानेवर यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भंडारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांचे नेतृत्वावर विश्वास ठेऊन काल त्यांचे लाखनी येथील जनसंपर्क कार्यालयात भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे दुपट्टे घालून डॉ. परिणय फुके यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी माजी खासदार शिशुपाल पटले, जिल्हा उपाध्यक्ष मयुरध्वज गौतम, किसान मोर्च्यांचे जिल्हा अध्यक्ष डॉ. हरेन्द्र रहांगडाले, प.स.चे सदस्य सुभाष बोरकर, पिपरी चुंनी चे सरपंच सुखदेव राऊत प्रामुख्याणे उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *