सरकार माय बापहो… आंगठा लावून धान कुठे विकू !

भंडारा पत्रिका/आशा वैद्य जांभोरा/करडी : भंडारा जिल्हा अन भातावर भिडला अशी एक म्हण आहे. कारण येथे धान (भात) मोठ्या प्रमाणात पिकते. बारीक प्रजातीचे धान (भात) जाऊन ठोकळ प्रजातीचे धान आता शासनाच्या लालसेपोटी शेतकरी पिकवू लागला आहे. धानाला भाव व बोनस असे शासनाचे प्रलोभन मिळत असल्याने जो तो धानाचे पिक घेतो आहे. एका एका जि.प. क्षेत्रात २-२ केंद्र असल्याने शेतकरी दादाला धान विकताना अडचणी येत नव्हत्या पण आता मोहाडी तालुक्यात केवळ २ केंद्र असल्याने आणि त्यातही नोंदणी करताना प्रत्यक्ष शेतकरी असला पाहिजे असा शासनाचा फतवा असल्याने शेतकरी याना तलाठी कार्यालयापासून ते केंद्र चालका पर्यंत रांगेत उभे रहावे लागत आहे. त्यातही म्हातारे शेतकरी निव्वळ आंगठा लावण्यासाठी मोहाडीला जावे लागत असून एखादेवेळी बरेवाईट झाले तर जबाबदार कोण असा प्रश्न आहे. तेव्हा शेतकरी राजाचा अंत न पाहता जुनेच केंद्र सुरु करून होत असलेली पिळवणूक थांबवावी अशी मागणी माजी सरपंच भूपेंद्र पवनकर यांनी केली आहे. प्राप्त माहितीवरून मोहाडी तालुक्यात मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन घेतले जाते. त्यातही करडी मुंढरी परिसर धानाचा म्हणून गणला गेला आहे. यापूर्वी या परिसरात करडी, मुंढरी, पालोरा, बोरगाव, नवेगाव, देव्हाळा आदी ठिकाणी खरेदी केंद्र हे शेतकरी बांधवाच्या इतर समस्या लक्षात घेता तयार करण्यात आले होते.

प्रत्येक केंद्रावर शासनामार्फत एका ग्रेडर ची नेमणूक केली जाते त्या अनुसंघाने प्रत्येक केंद्रावर ते झाले. पण शेतकरी काय दोषी की त्या धानाची इतरत्र विक्री होते. गैरव्यवहार केला जातो. चूक एकाची आणि शिक्षा दुसºयाला अशातला प्रकार सध्या सुरु असल्याने शेतकरी भरडला जातो आहे. मोहाडी तालुक्यात केवळ २ केंद्र सुरु आहेत. धान केंद्रावर धान नेण्या अगोदर ७/१२ व आठ अ, बँकेचा खाते क्रमांक, आधार कार्ड व संमतीपत्र आनलाईन करावा लागत असल्याने त्यातही प्रत्येक्ष शेतकरी असल्याने होत असल्याने शेतकरी यांची दमछाक होऊ लागली आहे. त्यातही वयोवृद्ध शेतकरी कुणी लकवा, वात, इतर आजाराने असून सुद्धा त्याला रांगेत उभे राहून केंद्रावर अंगठा लावूनच आनलाईन करावी लागत असल्याने दमछाक होत नाही. एक प्रकारे शासनाने शेतकरी यांची थट्टा केली जाते आहे. मोहाडी तालुक्यात केवळ २ केंद्र आहेत. इतर केंद्र बंद आहेत का बंद आहेत हे कुणी सांगू शकत नाही. ज्यांनी कुणी गैरव्यवहार केला त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे यात शेतकरी यांचा काय दोष. त्याला शिक्षा म्हणून द्यावी, आज ३५-४० किलोमीटर वरून मोहाडीला जावे लागते तेव्हा जुनेच करडी, पालोरा, डोंगरदेव, देव्हाडा येथील केंद्र सुरु करून आनलाईन प्रकिया पूर्ण करावी अशी मागणी माजी सरपंच भूपेंद्र पवनकर यांनी केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *