आज साडेतीन मुहूर्तापैकी एक मुर्हूत म्हणून अक्षय्यतृतीयेला महत्त्व

Discovering the Significance of Akshaya Tritiya for Griha Pravesh - TimesProperty

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी मोहाडी : हिंदू सणाचे वैशिष्ट्य असे आहे की, प्रत्येक सणाच्या मागे एक विचार आहे, अर्थ आहे. हिंदू संस्कृती विचारानुसार मनुष्ययोनीत जन्माला येणे म्हणजे जन्म-मरणाच्या चक्रातून कायमची सुटका करुन घेण्याची ती एक मोठी संधी असते. मनुष्ययोनीत जन्माला आलेल्या जीवाने या संधीचा योग्य तºहेने उपयोग करुन घेतला तर जन्ममरणाच्या फेºयातून त्याची सुटका होऊ शकते अन्यथा तो जीव पुन्हा पुन्हा त्याच त्या फेºयात फिरत राहतो. अक्षयतृतीस या दिवसाचे महत्त्व असे आहे की या दिवशी भूकेल्याला अन्न, तहानेल्याला पाणी, वस्त्रहीन व्यक्तीला वस्त्र याप्रकारे दानधर्म केल्यास पुण्य गाठीशी जमा होऊन मोक्षाचा मार्ग खुला होतो. जन्म-मरणाच्या फेºयातून मानवाची सुटका होऊ शकते. अशी समजूत आहे. मात्र अक्षयतृतीयेचा अर्थ ह्याहून व्यापक आहे. हा दिवा खºया अर्थाने कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. कृतज्ञता कोणाविषयी? तर पृथ्वी, आग, तेज, वायु व आकाश या पंचमाहाभुतांविषयी. कारण त्यांच्या साह्यानिच मनुष्य देहाला चैतन्य प्राप्त होते. आणि कृतज्ञता आपल्या पितरांविषयी, कारण त्यांच्यामुळेच आपल्या मनुष्य देहाचे दान मिळालेल आहे.

म्हणूनच अक्षयतृतीयाच्या दिवशी पितरांच्या स्मरणार्थ अन्नदान, वस्त्रदान, जलदान, करण्यात येते. वैशाख महिन्याच्या शुद्ध तृतीयेला अक्षयतृतीया साजरी करण्यात येते. याकाळातील निसर्गाचे दर्शनही मोठे अद्भूत असते. चित्राचे बोट आलेला वसंतऋतू वैशाखात जणू तारुण्याने मुसमुसलेला असतो. वैशाख शुद्ध तृतीयेला त्रेतायुगाचा प्रारंभ झाला. त्याचप्रमाणे चार युगांपैकी सुरुवातही याच दिवशी झाली, म्हणूनही हा अतिशय शुभदिन मानला जातो. आपल्या संस्कृतीत महुर्ताला अनन्यसाधारण महत्त्व आहे,योग्य मुहूर्तावर सुरु केलेल्या कार्यात हमखास यश मिळते अशी घट्ट समजूत आहे. म्हणूनच साडेतीन मुहूतार्पैकी एक मुहूर्त म्हणून अक्षय्यतृतीयेला महत्त्व आहे.मुहूर्त न बघताही या दिवशी नवीन वस्तू, वास्तू, वाहन, व्यवसाय आरंभ, शुभकार्य, सामाजिक कार्य केल्यास हमखास यश मिळत असे मानतात. अक्षय्य याचा अर्थ कधीही क्षय न होणारा,नाश न पावणारा असा आहे. म्हणूनच या दिवशी खरेदी वा शुभकार्यास आरंभ केल्यास त्यात उत्तरोत्तर प्रगतीच होत जाते. साडेतिन मुहुर्तांपैकी एक मुहूर्त म्हणुन ज्या दिवसाचे महत्व विशद केले जाते असा हा दिवस अक्षयतृतीया. आखाजी.. अश्या कितीतरी नावांनी साजरा होणारा हा सण भारतातल्या अनेक भागात निरनिराळया नावाने साजरा होतो. या दिवशी सुरू केलेल्या कुठल्याही कार्याचा क्षय होत नाही असे म्हणतात शिवाय या दिवशी आपण ज्या वस्तुंचे दान करतो त्या अक्षय प्रमाणात म्हणजेच विपुल प्रमाणात पुन्हा आपल्याला मिळतात म्हणुन अक्षयतृतीयेचे विशेष महत्व समजल्या जातं.

वैशाख मासातील शुक्ल पक्षातील तृतीया ही अक्षय तृतीया म्हणुन प्रसिध्दआहे. या दिवशी पाण्याचे दान करण्याचा देखील प्रघात आहे. मातीच्या घागरीत वाळा घालुन थंड पाणी ब्राम्हणाला दान दिल्यास ते आपल्या पितरांपर्यंत पोहोचते अशी समजुत आहे. थंडगार पाण्यासमवेत, कैरीचं पन्हे, वाटली डाळ, आंबा किंवा आंब्याचा रस, सातु, अश्या अनेक गोष्टींचे या दिवशी सेवन केले जाते आणि दान देखील करण्यात येतं. तसे पाहता या सर्व गोष्टी मनुष्याच्या जीवाला गारवा प्रदान करणाºया आहेत आणि अक्षयतृतीया हा दिवसच मुळी भर उन्हाळयात येणारा असल्याने या गोष्टींचे सेवन करून मनुष्याला आरोग्य लाभ मिळावा हा देखील हेतु या सर्व पदार्थांमधुन अभिप्रेत होतो. अक्षय तृतीयेपासुन अनेक ठिकाणी लोक आपल्या पुर्वजांच्या स्मृतीप्रित्यर्थ पाणपोया सुरू करतात अनेक ठिकाणी काठोकाठ भरलेले थंड पाण्याचे रांजण आपल्याला दृष्टीस पडतात ते याच दिवसापासुन. मनुष्याच्या जीवाला त्यांच्या आत्म्याला तृप्तता देउन पुण्य कमविण्याचा हा एक प्रयत्न दिसुन येतो. निसर्ग निर्मीत पाण्याचे साठे या दिवसांमधे कमी होत असल्यामुळे धनिक मंडळी पाणपोया सुरू करीत असावेत असा देखील एक कयास बांधल्या जातो. पुराणकथेनुसार या दिवशी महाभारताचे युध्द संपुन महर्षी व्यासांनी महाभारत ग्रंथाची रचना करण्यास आरंभ केला आणि लिहीण्याचे कार्य श्री गणेशाने केले असल्याचे नमुद आहे.

भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठीरास सांगितले की, या दिवशी केलेल्या दानाचा कधीही क्षय होतनाही म्हणुन या दिवसाला अक्षय तृतीया असे म्हणतात. परमेश्वराला आणि आपल्या पुर्वजांना स्मरण करून जे कार्य केले जाते ते सर्व अक्षय अर्थात अविनाशी होते. चैत्र महिन्यात अनेक सुवासिनी चैत्रा गौर मांडतात. चैत्रा गौरीच्या निमीत्ताने अनेक स्त्रिया हळदी कुंकवाचे आयोजन करून सवाष्णींना मोगºयाचा गजरा, कैरीची डाळ आणि पन्हे प्यावयास देतात. नव्या घरात गृहप्रवेश, वास्तु पुजन, नव्या व्यवसायाचा आरंभ, शुभविवाह, यांसारख्या गोष्टींकरता हा दिवस अतिशय शुभ मानल्या जातो. नवे अलंकार, सोने खरेदी केल्यास ती अक्षय होत असल्याने सोनारांच्या दुकानात या दिवशी मोठया प्रमाणात गर्दी पहायला मिळते. अक्षयतृतीयेच्या दिवशी नदीत किंवा समुद्रात स्नानाचे महत्व सांगीतले आहे.

फळे, वस्त्राचे दान, पंखा, तांदुळ, मीठ, साखर, तुप, चिंच याचे दान ब्राम्हणाला देऊन दक्षिणा द्यावी. ब्राम्हण भोजनाचे देखील या दिवशी महत्व आहे. या दिवशी सोन्याचे किंवा चांदीचे दागिने, नवे वस्त्र खरेदी करावे. वाहन घ्यावयाचे झाल्यास त्याची खरेदी अक्षयतृतीयेला करावी. या दिवशी सातुचे महत्व असुन त्याचे दान दयावे आणि सेवन देखील करावे. पाण्याने भरलेली घागर वाळा घालुन ब्राम्हणास दान द्यावी. पळसाच्या पानांनी बनवलेल्या पत्रावळीवर खीर, कैरीचे पन्हे, चिंचोणी,

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *