वीज वाहिन्यांवर झाडे कोसळल्याने वीज पुरवठा खंडित कर्मचाºयांच्या अथक परिश्रमानंतर वीज पुरवठा सुरळीत

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : शहरात गुरुवारी रात्री भयानक वादळासह आलेल्या पावसामुळे महावितरणच्या यंत्रणेला मोठा फटका बसला. या वादळात प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी नुकसानग्रस्त भागाला भेट देऊन दुरुस्ती कामांना अधिक गती देण्याचे निर्देश दिले. शहरात सुमारे ५० ठिकाणी झाडांच्या फांद्या, बॅनरचे कापड वीज वाहिन्यांवर कोसळल्याने वीज तारा तुटून वीज पुरवठा विस्कळीत झाला. गुरुवारी पाऊस कोसळत असतानाही महावितरणच्या कर्मचाºयांनी रात्रभर अथक कर्तव्य बजावून बहुतांश भागातील वीज पुरवठा सुरु केला. मात्र नरेंद्र नगर व अजनी परिसरातील काही भागात मोठी झाडे कोसळ्याने वीज पुरवठा दुरुस्तीचे काम दीर्घकाळ चालले. आज शुक्रवारी महावितरणचे शहरातील वादळाचा सर्वात जास्त प्रभाव नागपूर पश्चिम भागात दिसून आला. नरेंद्र नगर, मनीष नगर, त्रिमुर्ती नगर, लक्ष्मी नगर, बेसा, तात्या टोपे उद्यान, चितळे रोड, बिनाकी या भागात वादळी पावसामुळे मोठ-मोठी झाडे, झाडांच्या फांद्या, बॅनरची कापडे वीज वाहिन्यांवर पडल्याने वीज तारा तुटून वीज पुरवठा विस्कळीत झाला होता.

महावितरणच्या कर्मचा-यांनी रात्रीच घटनास्थळी जाऊन सर्वप्रथम ३३ व ११ किलोवॅटच्या उच्चदाबवाहिन्यांच्या दुरुस्तीस प्राधान्य दिले. त्यानंतर इतर लघुदाब वाहिन्यांवरील वीज पुरवठा सुरळीत करण्यास सुरवात केली. शहरातील बहुतांश भागात टप्याटप्याने वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. अनेक ठिकाणी पहाटेपर्यंतही हे काम सुरु होते. अजनी परिसरातील सावरकर नगर, सेंट्रल एक्ससाईज कॉलोनी, नरेंद्र नगर येथे मोठी झाडे कोसळल्याने महावितरणच्या संपूर्ण वीज तारा व पोल मोठया प्रमाणात नुकसानग्रस्तझाले. नरेंद्र नगर भागात सर्वाधिक नुकसान झाले. विशेषत: या भागातील खुल्या मैदान जवळील वीज तारांवर मोठ-मोठाली झाडे कोसळल्याने या झाडाच्या फांद्या बाजूला करून त्या नगर, श्रीनगर, विजयानंद सोसायटी इत्यादी भागास भेट दिली व वीज यंत्रणेच्या दुरुस्ती कामाबाबत दिशानिर्देश दिले व कामांना अधिक गती द्यावी असे सांगितले.

खांबावरील वीज तारांना परत जोडणी करण्याची मोठी कसरत महावितरण व महानगर पालिकेच्या कर्मचा-यांना करावी लागली. त्यामुळे या भागातील वीज पुरवठ्याचे काम रात्रीपासूनच सुरु होते ते आज दिवसाही चालू होते. दुपारी महावितरणचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, मुख्य अभियंता दिलीप दोडके, अधीक्षक अभियंता अमित परांजपे, कार्यकारी अभियंता समीर टेकाडे, उपविभागीय अधिकारी मुकेश चौधरी यांनी नरेन्द्र वादळी पावसामुळे प्रभावित झालेलय वीज यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी महावितरणची संपूर्ण यंत्रणा गुरुवारी रात्रभर व आज शुक्रवारी पूर्ण दिवस वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तत्पर होती. या सर्व कर्मचा-यांचे कौतुक करताना वीज ग्राहकांनी अशा आणीबाणीच्या प्रसंगात महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन प्रादेशिक संचालक सुहास रंगारी व मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी केले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *