‘रोड हिप्नॉसीस’मुळेच समृद्धीवर अपघात

प्रतिनिधी नागपूर : समृद्धी महामार्गावर वाहतुकीच्या नियमांचे सर्रास उलंघन होत असल्याने त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी नागपूर परिवहन विभागाने उपाययोजना करण्यास सुरुवात केली. या मार्गावर वाहन चालकांना सूचना आणि प्रबोधनासाठी तीन पथक तैनात केले आहेत. ‘रोड हिप्नॉसीस’ मुळे हे अपघात होत असल्याचे सांगितले जाते.

दिवसेंदिवस समृद्धी महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढताना दिसते. या ठिकाणी वेगमर्यादा दिलेल्या असताना अनेक जण नियम मोडून सुसाट वाहने पळवीत आहेत.

नागपूर-शिर्डी समृद्धी महामार्गावर ११ डिसेंबर ते २० जानेवारीदरम्यान ८०० पेक्षा अधिक अपघात प्रकरणांची नोंद झाली. अनेकांनी नियम मोडून सुसाट वाहन पळविल्याने त्यांच्याकडून दंडवसुली करण्यात आली. याबाबत नागपूर प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी रवींद्र भुयार यांनी सांगितले की, समृद्धी महामार्ग नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्याच्या सीमेपर्यंत ८३ किलोमीटरचा आहे. या रस्त्यावर अपघात होऊ नये म्हणून प्रवेशद्वाराजवळ चालकांचे प्रबोधन केले जाते. त्यासाठी तीन पथक तैनात केले असून, त्यात सहा परिवहन अधिकाºयांचा समावेश आहे. या मार्गावर वन्यप्राणी आणि इतरही प्राण्यांचा धोका आहे.वाहन चालकांनी सतर्क राहून वाहन चालवावे. १०० किलोमीटरचे अंतर पार केल्यानंतर थोडी विश्रांती घ्यावी. वाहनांची संपूर्ण तपासणी करावी, सीट बेल्टचा वापरा याबाबत प्रबोधन करण्यात येत आहे. वाहन चालवताना अचानक ब्रेक लावू नये, असे आवाहनही भुयार यांनी केले.

‘रोड हिप्नॉसीस’ म्हणजे काय?

‘रोड हिप्नॉसीस’ शारीरिक स्थिती आहे जी बहुतेक ड्रायव्हर्सना लक्षात येत नाही किंवा त्यांना माहिती नसते. ‘रोड हिप्नॉसीस’ रस्त्यावर मार्गस्थ असताना २.५ तासांनी सुरू होते. संमोहित चालकाचे डोळे उघडे असतात; परंतु मेंदू जे काही पाहतो ते रेकॉर्ड होत नाही. ‘रोड हिप्नॉसीस’ तुमच्या समोर उभ्या असलेल्या वाहनाला किंवा ट्रकला मागील बाजूस अपघात होण्याचे पहिले कारण आहे. संमोहित ड्रायव्हरला टक्कर होईपर्यंत शेवटच्या १५ मिनिटांत काहीही आठवत नाही. वेगाचे विश्लेषण करू शकत नाही. ‘रोड हिप्नॉसीस’पासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी दर २.५ तासांनी थांबणे, चालणे, चहा किंवा कॉफी पिणे आवश्यक आहे. लांब रस्त्यावर काही काळ चलचित्र बघितल्यासारखे वाटून नुसते बघत रहातो. वाहन चालवताना काही ठिकाणे आणि वाहने लक्षात ठेवणे आवश्यक आहे. जर तुम्हाला शेवटच्या १५ मिनिटांत काहीही आठवत नसेल, तर याचा अर्थ तुम्ही स्वत:ला आणि प्रवाशांना मृत्यूकडे नेत आहात. ‘रोड हिप्नॉसीस’ रात्रीच्या वेळी अधिक वेळा घडते आणि प्रवासीदेखील झोपलेले असल्यास परिस्थिती खूप गंभीर होते. डोळे उघडे असले तरी जर का मन बंद असेल तर अपघात अटळ आहे. गाडी चालवता चावलता ब्लँक होणे थांबवा, क्षणभर गाडी बाजूला घेऊन दीर्घ श्वास घ्या आणि फ्रेश होऊन इकडे तिकडे बघत पुन्हा उत्साहाने ड्रायव्हिंग सुरू करा.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.