सनाचा मृतदेह शोधून काढा,तिच्या मुलाला काय उत्तर देऊ!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : माझ्या आईचा मृतदेह मिळाला काय? या सनाच्या मुलाच्या प्रश्नावर काय उत्तर देऊ, काहीही करा, पण सनाचा मृतदेह हुडकून काढा, अशी आर्त हाक सनाची आई मेहरूनीसा यांनी पोलिस प्रशासनाला घातली आहे. सना ऊर्फ हिना खान हत्या प्रकरणाला २६ दिवस झाले, मात्र तिचा मृतदेह अजूनही मिळाला नाही. पोलिस प्रशासन शर्थीचे प्रयत्न करीत असले, तरी यश मिळाले नाही. एक आॅगस्टच्या रात्री सना जबलपूरसाठी निघाली. दुसºया दिवशी म्हणजे २ रोजी सकाळी पोहोचली. आई मेहरूनीसा यांना फोन करून तिने सुखरुप पोहोचल्याचे सांगितले. यावेळी मुलगा शाळेत गेलाकाय, असेही तिने विचारले. शाळेतून परतल्यावर त्याच्याशी बोलते, असे म्हणत तिने फोन ठेवला होता. मात्र, सनाची मुलाशी बोलण्याची इच्छा अपूर्णच राहिली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी अमितसह त्याच्या साथीदारांना अटक केली. आता सर्व आरोपींची कारागृहात रवानगी झाली आहे.

चौकशीत अमितने सनाच्या हत्येची कबुली दिली. मृतदेह हिरेन नदीत फेकल्याचे सांगितले. नागपूर आणि जबलपूरच्या पोलिस पथकाने बराच शोध घेतला. मात्र, सनाचा मृतदेह मिळाला नाही. सना आई-वडिलांची काळजी घ्यायची. तिच्या मृत्यूनेकुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अजूनही आमचे कुटुंब या सावरलेले नाही. घरातील प्रत्येक वस्तूत सनाच्या आठवणी आहेत.प्रत्येक दिवस तिच्या आठवणीत जात आहे. माज्या मुलीचा, एका मुलाच्या आईचा मृतदेह शोधून आणा. पोलिसांना कितीही प्रयत्न करावे लागले तरी चालेल. पोलिस प्रशासनावर माझा पूर्ण विश्वास आहे. मात्र, अमित पोलिसांची दिशाभूल करत आहे. पोलिसांचा तपास भरकटवतोय. पोलिसांनी वेगळ्या दिशेने तपास करून सनाचा मृतदेह शोधून आणावा, अशी विनंती मेहरूनीसा यांनी पोलिस प्रशासनाला केली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *