चिखला खाणीत ब्लास्टिंगमुळे घरांना तडे

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : तालुक्यातील चिखला येथे ब्रिटिश कालीन भूमिगत खाण आहे. येथे दर दोन दिवसात खाण परिसरातील नैसर्गिक टेकड्यात मोठे छिद्र करून ओपन कास्ट ब्लास्टिंग केली जात आहे. खाण ही भूमिगत असल्याने बाहेरील परिसरात ओपन ब्लास्टिंग करण्याचे कोणतेच कारण नाही. या ब्लास्टिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित असून यामुळे चिखला परिसरातील नागरिकांच्या घरांना तडे जात आहेत. तडे गेलेल्या घरात वास्तव्यामुळे नागरिकांच्या जीव धोक्यात आला आहे. स्थानिक नागरिकांनी आपण कुणीकडे जावे, असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा झाला आहे. तुमसर तालुक्यात चिखला येथे भूमिगत मॅगनिज खाण असून या परिसरात नैसर्गिक टेकड्या आहेत. संपूर्ण परिसर सातपुडा पर्वतरांगात आहे. दर दोन दिवसांनी येथे खाण प्रशासनाकडून ओपन कास्ट ब्लास्टिंग केली जात आहे. त्यामुळे चिखला गावातील नागरिकांच्या घरांना तडे आले असून अनेकठिकाणी भिंती दुभंगल्या आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.