गळफास घेऊन शिक्षकाची आत्महत्या

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : तालुक्यातील लवारी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली.नाव मनोज मोतीलाल मेश्राम वय ४९ वर्ष असे मृतक शिक्षकाचे नाव आहे. साकोली येथील आदर्श नगर जमनापुर कालोनी निवासी मनोज मोतीलाल मेश्राम ४९ वर्ष हे लवारी येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक पदावर कार्यरत आहेत .परंतु मागील दोन दिवसापासून त्यांची प्रकृती बरी नसल्याने ते घरीच होते. परंतु सकाळी नेहमीप्रमाणे शाळेत जाण्याची तयारी केली होती. त्यांनी आई ला भंडारा येथील डॉक्टरकडे उपचाराकरिता जाण्यासाठी सकाळी ७ वाजता साकोली बसस्थानकावर सोडले. आई भंडारा येथून घरी परत आली असता घराचा दरवाजा लावला होता. तेव्हा घराच्या भोवताल जाऊन आवाज मारू लागली. परंतु काहीच प्रतिसाद येत नसल्याने आईने खिडकीतून डोकावून बघितले असता मनोजने पंख्याला गळफास घेतल्याचे दिसले. आईने आरडाओरड करून शेजाºयांना बोलावले परंतु तोपर्यंत मनोज ची प्राणज्योत मावळली होती.

आईला बसस्थानक वर सोडल्यावर सकाळी ७ ते ८ च्या दरम्यान मनोज ने स्वत:ला फासावर लटकवल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मनोज मेश्राम यांच्या आई च्या तक्रारीवरून साकोली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही .मनोज मेश्राम हे आई सोबत स्वत:च्या घरी राहायचे. त्यांची पत्नी ही मुलांच्या शिक्षणासाठी नागपूर येथे राहत होती. पुढील तपास पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात हेड कॉन्स्टेबल युवराज वरकडे करीत आहेत मृतक मनोज मेश्राम याच्या मृत्यू पश्चात आई,पत्नी ,मुलगा व मुलगी आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *