गजानन महाराज प्रकटदिन थाटात साजरा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : जीव आणि ब्रम्ह वेगळे असून एक असल्याचा मूलमंत्र देणारे गजानन महाराज यांचा प्रकटदिन मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. गजानन महाराजांच्या प्रकट दिनी तुमसर शहरातील गजानन नागरी येथे भव्य पालखीचे आयोजन करण्यात आले. पालखीचे प्रस्थान नगरीच्या केंद्र स्थानी वसलेल्या महाराजांच्या मंदिरातून करण्यात आले. संपूर्ण नगरीत ढोलताशाच्या गजरात महाराजांचे स्तुतीगण करून जयघोष करण्यात आले. दरवर्षी प्रमाणे नगरीची धार्मिक परंपरा जोपासताना माजी नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांच्या परिवाराहस्ते कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नगरीतीलस्थानिकांनी पालखीचे दर्शन घेऊन मोठ्या भक्तिभावाने महाराजांना अभिवादन केले. दरम्यान महिला मंडळांनी मार्गक्रमन करताना एकरंगी पोशाख परिधान करून पालखीची समरसता जोपासली. मंदिर परिसरात अविरत भजन तर पालखीचे आयोजनातून गजानन महाराजांचा वसा पडोळे परिवाराने जोपासला आहे.यावेळी शिवशंकर पडोळे, दिलीप पडोळे, दीपेश पडोळे, रूपेश पडोळे, शीतल कालबांडे, शैलेश मेश्राम, शैलेश गजभिये, सुमित वसानी, तूफान कटरे, राखिलाल राणे, उमेश तिड़के, अरुण शहारे, कैलाश डड़ेमल, दुर्योधन सहारे, दिनेश पंचबुधे, श्रीराम मंडावी, रवि कहालकर, बबलू पांडे, गिरिपुंजे, लांजेवार, सरकार, सोयम, बिसने, पिकलमुंडे, भूतांगे, सौ.कांचनताई पडोळे, सो.वनिता पडोळे, सौ. रजनी पडोळे, सौ.वैशाली पडोळे, सौ.तेजस्वीनि मेश्राम, सौ.शिला गभने, सौ.नागपूरेताई, सौ.हिंगेताई, सौ.गिरिपुंजे ताई, सौ.हिंगुरकर, सौ. कोसरेताई, सौ. बिसनेताई, सौ.गजभिए ताई, जावळकर ताई, धोटे ताई यांच्या सह गजानन नगरीतील रहिवासी उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *