हिंदू, मुस्लीम सण उत्सव शांततेत पार पाडावे – जिल्हाधिकारी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा: जिल्हा पोलीस मुख्यालय येथील बहुउद्देशीय सभागृह येथे दि. १९ मार्च २०२४ रोजी जातीय सलोखा समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर तर प्रमुख अतिथि म्हणून भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपजिल्हा अधिकारी निवासी श्रीमती स्मिता बेलपत्रे, मुख्यअधिकारी करण कुमार चव्हाण, मुख्यअधिकारी विवेक मेश्राम, उपविभागीय पोलीस अधीकारी भंडारा, डॉ. अशोक बागुल, उपविभागीय पोलीस अधीकारी पवनी मनोज सिडाम यांचे उपस्थितीत कार्यक्रमाची सुरवात पुष्पगुच्छ देवुन स्वागत समारंभानी झाली. हिंदु व मुस्लीम यांच्यात ऐक्याची भावना राहावी म्हणुन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाची सुरवात पोलीस निरीक्षक तुमसर नरेंद्र हिवरे यांच्या प्रास्ताविकपर भाषणानी झाली. त्यांनी आपल्या भाषणात आगामी येणारे रमजान ईद, सण होळी, शिवजयंती, गुडफ्रायडे हे विविध धर्माचे सण, कापाठोपाठ येत आहेत, त्यामध्ये काही वाद होवु शकतात. त्यासाठी प्रतिष्ठीत नागरीकांनी स्वत: पुढाकार घेवुन शांततेत वाद मिटविला पाहीजे. जातीय सलोखाच्या बैठकीचा उद्देश आपल्या प्रास्ताविकपर भाषणातुन सांगितले. जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी अध्यक्षीय भाषणात सांगीतले, आज आपण शांतता समितीची बैठक घेण्याचे मुख्य कारण म्हणजे येणारे सण उत्सव शांततेत पार पाडावे. जगभरात वेगवेगळे सण उत्सव साजरे होतात. ते शांततेत पार पडल्यास संसस्कृत पणा समजला जाईल.

यावेळी हिंदु – मुस्लीम सण एकत्र येत असल्याने सर्व नागरीकांनी शांततेत पार पाडावी.यावेळी पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी सर्व प्रथम सर्वांचे आभार मानले. तसेच येणाºया सणा निमीत्य जिल्हयात शांतता राखण्यास पोलीस प्रशासन सज्ज आहे. १९ एप्रिलला चुनाव असल्याने सर्वांनी चुनाव करायचे आहे. व आपल्या परीवाराला सुध्दा चुनाव करायला सांगण्याबाबत सांगीतले तसेच तरुण पिढीहे व्हॉट्सअ‍ॅपवर एखादा चुकीचा मॅसेज असेल तर लोकांना फारवर्ड करु नये. त्यामुळे तरुण पिढीवर त्याचा वाईट परिणाम होणार, क्राईम दाखल झाल्यास त्याचे भविष्य खराब होणार. यावेळी सर्व एसडीएम, सर्व उपविभागीय अधिकारी भंडारा, पो.मु.भंडारा व पो.स्टे./शाखेचे पोलीस अधिकारी/कर्मचारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, जातीय सलोखा समिती सदस्य, दक्षता समिती सदस्या, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार बंधु व ईतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमामाचे सुंत्रसंचालन सहायक पोलीस निरीक्षक श्री. मट्टामी दोषसिध्दी कक्ष भंडारा व आभार प्रदर्शन प्रभारी पोलीस उपअधिक्षक (गृह) पोलीस निरीक्षक जितेन्द्र बोरकर जिवीशा भंडारा यांनी केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *