विजेच्या कडकडाटाने सिहोरा परिसर हादरले

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी सिहोरा : काल मंगळवारच्या रात्री अचानकच आलेला वादळी वारा, मुसळधार पाऊस, गारपिट व विजेच्या कडकडाटाने सिहोरा परिसर चांगलेच हादरले. यात शेतकºयांच्या पिकांचेही चांगलेच नुकसान झाले आहे. उन्हाळी धान पिकाला याचा फटका बसला आहे. शेतकरी आपला अन्नदाता व जगाचा पोशिंदा आहे. शेतात रात्रंदिवस काम करून जगाचे पोट भरवितो त्या शेतकºयांना गेल्या काही वर्षांत कधी पाऊस, कधी गारपीट तर कधी कडक उन्हाचा सामना करावा लागला आहे. अशावेळी काल आलेल्या अचानक मुसळधार पावसाने पिकांचे चांगलेच नुकसान झाले आहे. शेतकºयांचे प्रचंड नुकसान होत असून सुद्धा तो शेतात रात्रंदिवस राबत आहे. गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकºयांना नुकसान सहन करावे लागले होते. मात्र, असे असतांनाही शेतकरी हतबल न होता रब्बी पिकांची पेरणी केली. सर्व काही सुरळीत सुरू होते. पण, अचानक आलेल्या अवकाळी पावसाने व काल सायंकाळी झालेल्या गारपीटच्या तळाक्याने शेतकºयांच्या समस्या वाढल्या आहेत. वर्षभर शेतात कष्ट केल्यावर शेतकºयाला पीकातून उत्पादन मिळते. वर्षभराच्या उत्पादनातून मिळणाºया उत्पन्नाचे नियोजन करून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितो. पण, नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे. भंडारा जिल्हा ‘तांदळाचा जिल्हा’ म्हणून ओळखला जातो.

मात्र, गेल्या काही वर्षांत येथे भाताचे उत्पादन दिवसें दिवस घटत असल्याचे दिसून येत आहे. हवामानामुळे शेतकरी हैराण झाला असून, हवामान बदलामुळे व अवकाळी पावसाने सर्वाधिक नुकसान होत आहे. अवकाळी पावसाचा परिणाम केवळ भात पिकावरच होत नाही, तर त्याचा परिणाम रब्बी पिकासह पाले भाज्यांवरही दिसून येतो आहे. बदलत्या ऋतुचक्रामुळे शेती व्यवसायावरही मोठ्या प्रमाणात परिणाम होत असून, पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे शेतकºयांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. सिहोरा परिसरासह जिल्ह्यात गेल्या चार दिवसांत झालेल्या अवकाळी पावसासह गारपीटीमुळे रब्बी पिकांचेही अतोनात नुकसान झाले आहे. काल झालेल्या गारपीट मुळे धानाच्या पिकावर परिणाम होण्याचे चिन्ह शेतकरी वर्गात बोलले जात आहे. सतत अर्धा तास आलेला वादळी वारा, विजेचा कडकडाट व गारपीटी सह आलेल्या मुसळधार पावसाने सिहोरा व परिसर चांगलेच हादरले होते. हे येथे उल्लेखणीय आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.