शेतकºयांना रब्बी धानाच्या चुकाºयाची प्रतिक्षा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी सिहोरा : उन्हाळी हंगामातील धानाची विक्री शासनमान्य आधारभूत धान खरेदी केंद्रात करण्यात आली. मात्र, दोन ते अडीच महिन्यांचा कालावधी लोटूनही शेतकºयांच्या खात्यात धानाचे चुकारे वळते करण्यात आले नाही. जिल्हा पणन विभाग तथा शासनाच्या उदासीन पणाच्या धोरणामुळे शेतकरी आज हवालदिल झाला असून खरीप हंगामात शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडलेला आहे. खरीप हंगामात शेतकºयांनी धान पिकाची लागवड केली परंतु पिकांना रासायनिक खते, कीटकनाशके, शेतीला लागणारा खर्च कुठून करायचा? असा प्रश्न शेतकºयांसमोर उभा ठाकला आहे. तर पैशांसाठी शेतकºयांनी सावकारांकडे हात पसरविले आहे. दरम्यान तुमसर तालुक्यातील डोंगरला येथील आकांक्षा बहुउद्देशीय सहकारी संस्था या शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रात परिसरातील शेतकºयांनी धान विक्री केली होती.

परंतु, अजूनही शेतकºयांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाही. यामुळे संतप्त शेतकºयांनी धानाच्या चुकारासाठी चक्क जिल्हा पणन कार्यालय गाठून जिल्हा पणन विभागाच्या अधिकाºयांना निवेदन दिले आहे. निवेदनात असेही म्हटले आहे की शेतकºयांच्या खात्यावर येत्या आठ दिवसात पैसे जमा न झाल्यास जिल्हा पणन कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन उभारण्याचा इशारा सुद्धा राजू रहांगडाले, पिरमन रहांगडाले, शोभेलाल शरणांगत, छन्नुबाई ठाकूर, गजानन पटले, दिगंबर शरणांगत, राजेंद्र कटरे, दिनकर अवतरे, गिरधारी परिहार, देवदास बिसने, दीनदयाल पटले, प्रकाश बिसने, गजानन पटले, हगरू पटले, शांताबाई बनकर, शंकर रहांगडाले, श्रीराम सतीशहारे, राणा रहांगडाले तथा शेतकºयांनी निवेदनातून दिला आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *