मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातुन आरक्षण न देता स्वतंत्र आरक्षण द्या

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी : मराठा समाजाच्या आरक्षणाला ओबीसी समाजाचा विरोध नाही .मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातुन आरक्षण न देता स्वतंत्र आरक्षण द्यावे अशी मागणी ओबीसी संघटनांनी केली आहे.यासंदर्भात प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री यांना तहसीलदार लाखनी मार्फत निवेदन पाठविण्यात आले. सध्या जालन्यात मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातुन आरक्षण राज्य सरकारने द्यावे ,मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे याकरिता मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. राज्य सरकार मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गातुन आरक्षण देण्याच्या तयारीत आहे. या आरक्षणाला ओबीसी समाजाचा विरोध आहे. ओबीसी प्रवर्गाची आजपर्यंत जनगणना न झाल्याने त्यांना त्यांच्या संख्येनुसार आरक्षण दिले गेले नाही परतया प्रवर्गात मराठ्यांना आरक्षण दिल्यास सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास असलेल्या ओबीसी प्रवर्गातील खºया आरक्षणास पात्र असलेल्या जातींना याचा फटका बसेल परिणामी संपूर्ण ओबीसी प्रवर्गाचे मोठे नुकसान होईल, म्हणून राज्य सरकारने मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातुन आरक्षण न देता स्वतंत्र आरक्षण द्यावे आमचे या आरक्षणाला समर्थन आहे .

राज्य सरकारने बिहार राज्याप्रमाणे जातीनिहाय जनगणना करून ओबीसींना आणि मराठ्यांना त्यांच्या संख्येनुसार आरक्षण द्यावे. राज्य सरकारनेमराठ्यांना ओबीसी प्रवर्गातुन आरक्षण दिल्यास ओबीसी समाजात राज्य शासनाप्रती असंतोष निर्माण होऊन ओबीसी समाज या अन्यायाविरुद्ध रस्त्यावर उतरून विरोध करेल या संदर्भात निवेदन लाखनीचे तहसीलदार मार्फत प्रधानमंत्री व मुख्यमंत्री यांना ओबीसी शिष्टमंडळाने दिले. यावेळी ओबीसी संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रा. उमेश सिंगनजुडे ,डॉक्टर चंद्रकांत निंबार्ते,जयकृष्ण फेंडरकर,माधवराव भोयर, गुणीराम वंजारी, एकनाथ बडवाईक , ज्ञानेश्वर गिरीपुंजे ,दिगंबर खंडाइत , जगदीश वाघाये, अभय भदाडे, प्रा. सोमेश्वर धांडे, भगीरथ लांडगे, उमेश झंजाड ,सदानंद फंदे ,किशोर बुराडे ,शेखर लांडगे ,लीलाधर किरणापुरे ,दिलीप गायधने सुनील चापले ,अमोल घुले डी बी झिंगरे ,प्रा उमेश रेहपाडे, धनु हेमणे,रुपेश नागलवाडे उपस्थित होते

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *